आग लागून संसारोपयोगी साहित्य खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 11:53 PM2019-03-15T23:53:54+5:302019-03-15T23:54:15+5:30

तालुक्यातील आमला येथील एका घरास आग लागून घरातील संसारपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना १४ मार्च रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने गॅसच्या टाकीने पेट घेतला नाही, त्यामुळे पुढील अनर्थ टळला अशी प्रतिक्रिया ग्रामस्थ देत होते.

 Fire-fighting equipment | आग लागून संसारोपयोगी साहित्य खाक

आग लागून संसारोपयोगी साहित्य खाक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : तालुक्यातील आमला येथील एका घरास आग लागून घरातील संसारपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना १४ मार्च रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने गॅसच्या टाकीने पेट घेतला नाही, त्यामुळे पुढील अनर्थ टळला अशी प्रतिक्रिया ग्रामस्थ देत होते.
हिंगोली तालुक्यातील आमला येथील गोवर्धन कामखेडे यांच्या टीनपत्राच्या घराला गुरूवारी अचानक आग लागली. घरावरील विद्युत तारा तुटल्याने ही आग लागल्याचे कामखेडे यांनी सांगितले. आगीमध्ये घरातील धान्य व संसारपयोगी सर्व साहित्य जळुन खाक झाले आहे. पत्नी व लहान मुलाबाळांना कामखेडे यांनी नुकतेच नवीन कपडे घेऊन ठेवले होते.
परंतु आगीत कपडे व पैसेही जळून गेले. सुदैवाने मात्र घरातील गॅसच्या टाकीने पेट घेतला नाही, त्यामुळे पुढील अनर्थ टळला, असे कामखेडे यांनी सांगितले.
घटनास्थळी जाऊन ग्रामसेवक भारत कोकरे यांनी भेट देऊन पाहणी केली. ते म्हणाले, कामखेडे यांच्या घरातील सर्व साहित्य आगीत जळाले आहे, महावितरणचे विद्युत तार पडल्याने आग लागली, असे त्यांनी सांगितले.

Web Title:  Fire-fighting equipment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.