बसमधून प्रवाशांचा जीवघेणा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 12:17 AM2019-04-02T00:17:32+5:302019-04-02T00:18:14+5:30

वसमत- औंढा या मार्गावर वसमत आगाराकडून ऐन लग्नसराईतसुद्धा प्रवाशासाठी मोडकळीस आलेल्या बसेस सोडण्यात येत आहेत. मोडकळीस आलेलया बसमधून प्रवाशांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. लाल परी रस्त्यावर दररोज ‘फेल’ होत आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.

 Fatal travel of passengers by bus | बसमधून प्रवाशांचा जीवघेणा प्रवास

बसमधून प्रवाशांचा जीवघेणा प्रवास

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शिरड शहापूर : वसमत- औंढा या मार्गावर वसमत आगाराकडून ऐन लग्नसराईतसुद्धा प्रवाशासाठी मोडकळीस आलेल्या बसेस सोडण्यात येत आहेत. मोडकळीस आलेलया बसमधून प्रवाशांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. लाल परी रस्त्यावर दररोज ‘फेल’ होत आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.
वसमत- औंढामार्गे हिंगोली जिल्ह्याच्या ठिकाणी ये-जा करणाऱ्या प्रवाशांची मोठी संख्या आहे. वसमत- औंढा हे अंतर ४० कि.मी. असल्याने या मार्गावर नेहमीच प्रवाशांची वर्दळ असते. व सध्या लग्नसराईचे दिवस असल्यामुळे बसथांब्यावर प्रवाशांची मोठी गर्दी दिसत आहे. परंतु आगाराकडून बसथांब्यावर प्रवाशांची मोठी गर्दी दिसत आहे; परंतु आगाराकडून प्रवाशांना नेहमीच वेठीस धरले जात आहे. या मार्गावर फेऱ्या मारणाºया बसेसच्या खिडक्या तुटलेल्या, आसनव्यवस्थेवरील स्पंज गायब, चालक व वाहकाजवळजील दरवाजाची दयनीय अवस्था, समोरील काचा फुटलेल्या, इंजिनसमोरील बहुतांश भाग खिळखिळा झालेला आहे.
अशा नादुरूस्त बसेसचा वापर करणे चुकीचे आहे. नादुरूस्त बसेस असल्याने या गाड्या केव्हा व कोठे बंद पडतील, याचा नेम नाही. त्यामुळे प्रवासी खाजगी वाहनांतून प्रवास करणे पसंत करीत आहेत.

Web Title:  Fatal travel of passengers by bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.