शेतकरी संपाला आंदोलनाची धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2017 05:27 PM2017-06-03T17:27:10+5:302017-06-03T17:27:10+5:30

शेतकरी संपावर तर जातच आहेत. शिवाय आंदोलनेही केली जात असल्याने सध्या जिल्हा या एकाच वातावरणाने ढवळून निघाला आहे.

The edge of the movement of farmers in the movement | शेतकरी संपाला आंदोलनाची धार

शेतकरी संपाला आंदोलनाची धार

googlenewsNext
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत 
हिंगोली, दि. 3-  शेतकरी संपावर तर जातच आहेत. शिवाय आंदोलनेही केली जात असल्याने सध्या जिल्हा या एकाच वातावरणाने ढवळून निघाला आहे. संपूर्ण शेतकºयांना कर्जमाफीशिवाय स्वस्थ बसणार नाहीत, अशी भूमिका अनेक शेतक-यांची दिसत आहे.
शनिवारी आखाडा बाळापूर येथे राष्ट्रीय महामार्गावर शेतकºयांनी आंदोलन केले. आंबे घेवून जाणारा ट्रक आडवून त्यातील आंबे व एका ऑटोतील मिरच्या, भाजीपाला, कांदे रस्त्यावर टाकले. पाऊणतास रास्ता रोको केला. वसमत तालुक्यातील कुरुंद्यात आठवडी बाजार बंद ठेवण्यात आला. तर सेनगाव तालुक्यात वटकळी, हत्त्ता, रिधोरा येथे शेतकºयांनी सकाळी १0 ते १२ या वेळेत रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे अर्धा तालुकाच जाम झाला होता. आज हिंगोलीच्या बाजारपेठेत पुन्हा कमी भाजीपाला आल्याने भाववाढ झाली होती. तर चहाची अनेक दुकानेच बंद राहिली. दूध विक्रेते हॉटेलला दूध घालत नसल्याने हे चित्र होते. शेतकरीही मोंढ्यात धान्यच विकायला नेत नसून आंदोलनात धान्याची नासाडी होण्याची धास्ती घेत आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अल्पभूधारक शेतकºयांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले असले तरीही शेतकºयांनी मात्र आंदोलन मागे घेतले नसल्याचे दिसून येत आहे. शेतकºयांमध्ये फूट पाडण्यात येत असल्याचा आरोप करून आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा शेतकरी देत आहेत.

Web Title: The edge of the movement of farmers in the movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.