महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2018 12:15 AM2018-10-08T00:15:49+5:302018-10-08T00:16:07+5:30

वसमत तालुक्यातील डोणवाडा येथील महिलेस एका इसमाने लग्नाचे आमिष दाखवले. तिला पतीपासून दूर करून तिच्यासोबत तो दोन महिने राहिला. पण महिलेसोबत लग्न केले नाही. याप्रकरणी इसमाने फसवणूक केल्याची तक्रार महिलेने कुरूंदा ठाण्यात दिली. त्यावरून आरोपीविरूद्ध प्रतिबंधक कार्यवाहीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 Crime against women for cheating | महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा

महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
कुरूंदा : वसमत तालुक्यातील डोणवाडा येथील महिलेस एका इसमाने लग्नाचे आमिष दाखवले. तिला पतीपासून दूर करून तिच्यासोबत तो दोन महिने राहिला. पण महिलेसोबत लग्न केले नाही. याप्रकरणी इसमाने फसवणूक केल्याची तक्रार महिलेने कुरूंदा ठाण्यात दिली. त्यावरून आरोपीविरूद्ध प्रतिबंधक कार्यवाहीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डोणवाडा येथील फिर्यादीस दोन महिन्याखाली ३१ जुलै रोजी लग्नाचे आमिष दाखवून तिच्या पतीपासून दूर करून आरोपी तिच्यासोबत दोन महिने राहिला; परंतु फिर्यादीस लग्न न करता फसवणूक केली. या प्रकरणी फिर्यादीने कुरूंदा पोलीस ठाण्यात वसमत तालुक्यातील वापटी येथील आरोपीने फसवणूक केल्याची तक्रार दिली आहे.
फिर्यादीच्या तक्रारीवरून ६ आॅक्टोबर रोजी कुरूंदा पोलीस ठाण्यात आरोपी दत्ता शिंदे (रा.वापटी) यांच्याविरूद्ध कलम ४१७ भादंवि प्रमाणे पब्लिक एन.सी.चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास जमादार बी.टी.केंद्रे हे करीत आहेत.

Web Title:  Crime against women for cheating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.