छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याचे रविवारी आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 12:16 AM2018-07-14T00:16:40+5:302018-07-14T00:17:09+5:30

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे १५ जुलै रोजी सकाळी १० वाजता आगमन होणार आहे. हिंगोली शहरातून मोठ्या थाटात शिवरायांच्या पुतळ्याची मिरवणुक काढण्यात येणार आहे.

 Chhatrapati Ashwarad statue arrives Sunday | छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याचे रविवारी आगमन

छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याचे रविवारी आगमन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे १५ जुलै रोजी सकाळी १० वाजता आगमन होणार आहे. हिंगोली शहरातून मोठ्या थाटात शिवरायांच्या पुतळ्याची मिरवणुक काढण्यात येणार आहे.
हिंगोली शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे आगमन होणार असून पुतळा समितीच्या वतीने विविध कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. पुतळा समितीने ठरविल्याप्रमाणे शहरातील मुख्य मार्गावरून अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची मिरवणूक काढण्यात येणार आहे. जास्तीत जास्त शिवप्रेमींनी मिरवणुकीत सहभागी होण्याचे आवाहन पुतळा समितीचे अध्यक्ष माजी आ. भाऊराव पाटील गोरेगावकर, कार्याध्यक्ष आ. तानाजी मुटकुळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, दिलीप चव्हाण, त्र्यंबक लोंढे, कोषाध्यक्ष प्रल्हाद शिंदे व आदींनी केले आहे.
मिरवणुकीचा मार्ग
४नर्सीफाटा - अग्रसेन चौक - इंदिरागांधी चौक - जवाहर रोड - पोस्ट आॅफिस - विश्रामगृह - पुतळ्याचे नियोजित ठिकाण असा मिरवणुकीचा मार्गक्रम असल्याची माहिती पुतळा समितीच्या वतीने देण्यात आली आहे.

Web Title:  Chhatrapati Ashwarad statue arrives Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.