तलाठी सज्जांसाठी प्रहार जनशक्तीचे बोंबाबोंब आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 12:22 AM2018-12-01T00:22:34+5:302018-12-01T00:22:41+5:30

जिल्ह्यातील पाचही तालुक्यातील संपूर्ण तलाठ्यांनी शासकीय अभिलेखे असणारी दप्तरे ही तलाठी सज्जावरच ठेवावीत तसेच तलाठ्यांना संगणकीकृत लॅपटॉप इतर आवश्यक असणारे साहित्य जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तत्काळ उपलब्ध करून तलाठी सज्जावरच सर्व शेतकऱ्यांना शेतीसंबंधी दस्ताऐवज उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हा कचेरीसमोर ३० नोव्हेंबर रोजी बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.

 The Bandobomb movement of Manashakti for the Talathi preparations | तलाठी सज्जांसाठी प्रहार जनशक्तीचे बोंबाबोंब आंदोलन

तलाठी सज्जांसाठी प्रहार जनशक्तीचे बोंबाबोंब आंदोलन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यातील पाचही तालुक्यातील संपूर्ण तलाठ्यांनी शासकीय अभिलेखे असणारी दप्तरे ही तलाठी सज्जावरच ठेवावीत तसेच तलाठ्यांना संगणकीकृत लॅपटॉप इतर आवश्यक असणारे साहित्य जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तत्काळ उपलब्ध करून तलाठी सज्जावरच सर्व शेतकऱ्यांना शेतीसंबंधी दस्ताऐवज उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हा कचेरीसमोर ३० नोव्हेंबर रोजी बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.
सार्वजनिक अभिलेखे कशी ठेवावीत, याबाबत २००५ च्या अधिनियमात माहिती नमूद आहे. परंतु या अधिनियमानुसार जिल्ह्यामध्ये एकाही तलाठी सज्जावर तलाठी न बसता हे त्यांच्या घरात किंवा तहसील परिसरात बसत आहेत. त्यामुळे शेतकºयांना शेतीकामासाठी त्यांचा शोध घ्यावा लागतो. त्यामुळे शेतकºयांची गैरसोय होते. त्यामुळे जिल्ह्यातील सज्जानिहाय सर्व तलाठ्यांना दहा दिवसांच्या आत दप्तर मुख्यालयीन नेण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी द्यावेत, अशी मागणी आंदोलनादरम्यान करण्यात आली. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख अ‍ॅड. विजय राऊत, रवि बांगर, विलास आघाव, रमेश कोरडे व पदाधिकारी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.

Web Title:  The Bandobomb movement of Manashakti for the Talathi preparations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.