हरभरा खरेदी ५ टक्केच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 01:23 AM2018-05-16T01:23:59+5:302018-05-16T01:23:59+5:30

राज्य शासनाने जिल्ह्यात पाच ठिकाणी तुरीचे हमीभाव खरेदी केंद्र सुरु केले होते. मात्र ६२०१ शेतकऱ्यांची ६९८०१ क्विंटलच तूर खरेदी झाली आहे. तर अजून ७५२५ नोंदणीकृत शेतकरी शिल्लक आहेत. हरभरा तर ४४४२ शेतक-यांपैकी केवळ २६७ जणांचाच खरेदी केला.

 5 percent of gram procurement | हरभरा खरेदी ५ टक्केच

हरभरा खरेदी ५ टक्केच

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : राज्य शासनाने जिल्ह्यात पाच ठिकाणी तुरीचे हमीभाव खरेदी केंद्र सुरु केले होते. मात्र ६२०१ शेतकऱ्यांची ६९८०१ क्विंटलच तूर खरेदी झाली आहे. तर अजून ७५२५ नोंदणीकृत शेतकरी शिल्लक आहेत. हरभरा तर ४४४२ शेतक-यांपैकी केवळ २६७ जणांचाच खरेदी केला.
जिल्ह्यातील सर्वच केंद्रावर तूर खरेदीमध्ये आतून सुरु असलेल्या राजकारणामुळे शेतकºयांचे मात्र दिवाळेच निघत आहे. लागेबांधे असलेल्यांचीच तूर खरेदी होत आहे, यातही काही शंका नाही. काही ठरावीक शेतकºयांचीच कितीही तूर खरेदी करण्याचा प्रकारही घडत आहे. यापूर्वी झालेल्या घोटाळ्यानंतर कोणताच बोध घेतला नाही. यंदा जिल्ह्यात तुरीचे उत्पादन चांगले झाले आहे. मात्र सुरुवातीच्या काळात केंद्र सुरु झाले नसल्याने शेतकºयांनी खाजगी बाजारात मिळेल त्या दरात तुरीची विक्री केली. नंतर कुठे तरी नाफेडमार्फत खरेदी सुरु केली. तीन महिन्यांत नाफेडने ६ हजार २०१ शेतकºयांची ६९ हजार ८०१. ५० क्विंटल तूर खरेदी केली. यामध्ये हिंगोलीच्या केंद्रावर ७४९ शेतकºयांची १०७६५.५० क्विंटल, सेनगावात १६३२ शेतकºयांची २२७७४ क्विंटल, कळमनुरीच्या खरेदी केंद्रावर १३२९ शेतकºयांची १४२११ क्विंटल, वसमत येथील खरेदी केंद्रावर ९७० शेतकºयांची ७७७७. ५० क्विंटल तर जवळा बाजार येथे १५२१ शेतकºयांची १४७७०. ५० क्विंटल अशी एकूण ६२०१ शेतकºयांची ६९ हजार ८०१. ५० क्विंटल तूर खरेदी केली आहे. तर अजून या ठिकाणी नोंदणी केलेल्या ७ हजार ५२५ शेतकºयांची तूर खरेदी बाकीच आहे. कधी- खरेदी खरेदी केंद्रावर खरेदी कमी आणि गोंधळच जास्त होत असल्याचे चित्र असल्याने खरेदी मंद गतीने केली जाते.
जिल्ह्यात हिंगोली येथील केंद्र वगळता इतर ठिकाणी बºयापैकी हरभरा खरेदी सुरु आहे. हिंगोली मात्र जागेअभावी एक कधी दोन शेतकºयांची खरेदी केली जाते. जिल्ह्यात हरभरा विक्री करण्यासाठी जवळपास ४ हजार४४२ शेतकºयांनी नोंदणी केली आहे. यामध्ये केवळ २६७ शेतकºयांचा हरभरा खरेदी
केला आहे. यामध्ये हिंगोली १६६४. ५० क्विं. सेनगाव ३१०. ५०, कळमनुरी ००, वसमत २५४ क्विं. आणि जवळा बाजार येथे १ हजार ७२१. ५० क्विंटल असे एकून २७६ शेतकºयांची खरेदी केली. २९ मेची हरभरा खरेदीची डेटलाईन दिली आहे.
एका शेतकºयाची लपून तूर खरेदी तर केली. मात्र हिशेबात गोंधळ होत आहे. यावरून बाजार समितीच्या शेतकरी भवनात खुर्च्यांची फेकाफेकीही झाल्याची चर्चा जोरात ऐकायला मिळत आहे.
आजपासून तूर खरेदी बंद
बुधवारपासून हमीभाव केंद्रावर तूर खरेदी बंद होणार आहे. त्यामुळे ७५२५ शेतकºयांच्या तुरीचा प्रश्न निर्माण होणार आहे. कदाचित यापैकी काही शेतकºयांना पैशांची निकड असल्याने त्यांनी खाजगी बाजारपेठेत तूर विकली असेलही मात्र त्यातूनही राहिलेल्या शेतकºयांनी प्रतीक्षा करूनही शासन तूर खरेदी करीत नसल्यास करायचे तरी काय? असा प्रश्न आहे. हिंगोलीतील ३५५८ पैकी ७४९, सेनगावचे २७९0 पैकी १६३२, कळमनुरीचे २६५६ पैकी १३२९, वसमतचे १७५३ पैकी ९७0 तर जवळा बाजारचे २९६९ पैकी १५२१ जणांचीच तूर खरेदी झाली.
हरभºयालाही २९ मेचीच मुदत
हमीभाव केंद्रावर हरभरा खरेदीसाठी २९ मेची मुदत आहे. तर अवघ्या २६७ शेतकºयांची तूर खरेदी झाली. कळमनुरीत तर हरभरा खरेदीचे खातेच उघडलेले नाही. या बाजार समितीत तूर खरेदी प्रकरणात सभापती, संचालक व सचिवही लाचलुचपतच्या जाळ्यात अडकल्याने गोत्यात आले होते. तर हरभरा खरेदी ही बाजार समिती करू शकली नाही. नोंदणी केलेल्या हरभरा उत्पादकांची संख्या हिंगोली १३९४, सेनगाव-२३७, कळमनुरी-२२३, वसमत-९३७ व जवळा बाजार १६५१ अशी आहे. तर पावसाळ्याचे दिवस जवळ आल्याने हा प्रश्न चिघळू शकतो.

Web Title:  5 percent of gram procurement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.