प्रेताची विटंबना केल्याप्रकरणी नातेवाईकांसह 15 जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 07:07 PM2019-06-07T19:07:22+5:302019-06-07T19:08:24+5:30

मृतदेह पोलीस ठाण्यात तसेच रस्त्यावर ठेऊन नातेवाईकांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

15 accused in connection with insult of dead body in Hingoli | प्रेताची विटंबना केल्याप्रकरणी नातेवाईकांसह 15 जणांवर गुन्हा दाखल

प्रेताची विटंबना केल्याप्रकरणी नातेवाईकांसह 15 जणांवर गुन्हा दाखल

googlenewsNext

औंढा नागनाथ (हिंगोली ) :तालुक्यातील येळी येथील महिलेचा पाण्याच्या कारणावरून  हनांनामारीत मृत्यू झाला होता या प्रकरणी मयतावर अंत्यसंस्कार न करता प्रेत थेट पोलीस ठाण्यात आणले तसेच रस्त्यावर ठेऊन गुरुवारी आंदोलन केले. यात प्रेताची विटंबना झाल्याने पोलिसांनी मृताच्या नातेवाईकांवर आणि इतर 15 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. 

औंढा नागनाथ तालुक्यातील येळी येथे बुधवारी  सार्वजनिक रडत्यावरून  पाणी भरायला जाण्याच्या कारणावरून  दोन गटात वाद झाला होता यात चंद्रकला घुगे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला यात त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला या बाबत आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्याच्या मागणीसाठी नातेवाईक व काही नागरिकांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार न करता शुक्रवारी दुपारी 12 वाजता पोलिस ठाण्यात आणले होते. गुन्हा दाखल होत नाही तोपर्यत अंत्यसंस्कार करण्यात येणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली. दरम्यान, वादळ वाऱ्यामुळे पोलीस ठाण्यात वीज नव्हती. पोलिसांनी वीज आल्यास गुन्ह्याची नोंद करण्यात येईल असे सांगूनही आंदोलकांनी प्रेत ठाण्यात ठेवले. तसेच यानंतर प्रेत औंढा- हिंगोली मार्गावर ठेवत आंदोलन केले. 

यानंतर आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आली. मात्र यात मृतदेहाची विटंबना झाल्याने पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांनी स्वतः  आंदोलकांविरोधात फिर्याद दिली. यावरून दत्ता घुगे, राणोजी घुगे व इतर 10 ते 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि राहुल बहुरे तपास करत आहेत.

Web Title: 15 accused in connection with insult of dead body in Hingoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.