PCO : जगण्यात जान नाही, लाइफ कण्ट्रोलमध्ये नाही असं वाटतंय? मग तुम्हाला पीसीओची गरज आहे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 05:26 PM2017-11-30T17:26:44+5:302017-11-30T17:27:38+5:30

रोज सकाळी उठल्यावर फक्त या 3 गोष्टी करा, लाइफ में जान आ जाएगी!

PCO: Do not have life in life, do not feel like being in life control? Then you need a PCO! | PCO : जगण्यात जान नाही, लाइफ कण्ट्रोलमध्ये नाही असं वाटतंय? मग तुम्हाला पीसीओची गरज आहे!

PCO : जगण्यात जान नाही, लाइफ कण्ट्रोलमध्ये नाही असं वाटतंय? मग तुम्हाला पीसीओची गरज आहे!

Next
ठळक मुद्देरोजचा दिवस आपल्यासाठी एक संधी असते, आपण काल आणि आजचा विचार करत ती वाया घालवतोय का?

टेलीफोन बुथचे पीसीओ अर्थात पब्लिक कॉल ऑफिस आपल्याला माहिती आहेत. पण हे पीसीओ ते नाही. हे प्रकरण वेगळं आहे. रोज सकाळी उठल्यावर करायची ही त्रिसूत्री. ती जर आपण नीट जगू लागलो तर आपलं आयुष्य बदलून जाऊ शकतो. जगभरात जे जे यशस्वी लोक ते ते या पीसीओच्या वाटेनं गेलेले दिसतात. कधी ठरवून कधी न ठरवता, जगण्याची शिस्त म्हणून. आपल्या जगण्याला ती शिस्तच नसते आणि घोळ होतो तो तिथेच. आपण काहीच ठरवत नाही. आपल्याला काही ठरवता येत नाही आणि ठरवण्याची उमेद असली तरी जगण्यावर आपला कण्ट्रोल आहे असं आपल्याला वाटत नाही. तुम्हाला तसं वाटत असेल तर तुम्हाला ही पीसीओ नावाची जगण्याची आनंदी चावीच सापडलेली नाही असं समजा. आणि लाइफमध्ये जान आणायची असेल तर ही पीसीओची थ्री डायमेन्शन त्रीसुत्री जगायला लागा. आणि विचारा की हे पीसीओ नक्की काय आहे?

पीसीओ म्हणजे पर्पज ( हेतू-लक्ष्य), कण्ट्रोल ( नियंत्रण), ऑप्टिमिझम ( आशा-उमेद). तेच हे पीसीओ.
1) पर्पज
जगण्याचं ध्येय वगैरे सोडून द्या. सकाळी उठताच स्वतर्‍ला विचारा की, आजचा दिवस जगायचं आपलं लक्ष्य काय? आजच्यापुरता विचार करा. आजच्यापुरतं जगण्याचं पर्पज शोधा. दिवस मावळेर्पयत ते पर्पज पूर्ण कसं होतं, याचा विचार करा. आणि जग बदलून टाकायचं नाही, आज पाणीपुरी खायची एवढंच ठरवलं तर ते तुमचं लक्ष्य. निदान ते पूर्ण होइल यासाठी कामाला लागा.
2) कण्ट्रोल
पर्पज ठरलं की मग विचारा की ते करण्यासाठी माझ्या हातात काय काय आहे. जिंदगीच्या गाडीचा कुठला कण्ट्रोल माझ्या हातात आहे. मला शक्य काय आहे. जे अशक्य ते सोडून द्या. त्याचा विचार करु नका. जे शक्य त्याचा कण्ट्रोल हातात घ्या. गोष्टी कागदावर लिहा. कामाला लागा.
3) ऑप्टिमिझम
आशा, उमेद. काहीच खरं नाही. मला काहीच जमणार नाही. हे रडगाणं सोडा. जे ठरवलं, ते कसं करायचं याचा विचार केला की ते होऊ शकेल, जमेल अशी आशा वाटते. ते काम पूर्ण झालं की आनंद वाटतो. आपण जे ठरवलं ते होतंच याचा अनुभव एकदा यायला लागला की जिंदगीला बेलाशक भिडा. जित तो होनी ही है!

Web Title: PCO: Do not have life in life, do not feel like being in life control? Then you need a PCO!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.