गाणी ऐकत झोपणं हानिकारक की फायदेशीर?, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2018 12:32 PM2018-12-03T12:32:42+5:302018-12-03T12:35:28+5:30

म्युझिक म्हणजे अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय. कदाचितच अशी एखादी व्यक्ती असेल जिला म्युझिक आवडत नसेल. आता तर म्युझिक थेरपीचा वापर करून रूग्णांना ऑल्टरनेट ट्रिटमेंट देण्याचे प्रयोगही करण्यात येत आहेत.

is it safe to sleep while listening to music know all details | गाणी ऐकत झोपणं हानिकारक की फायदेशीर?, जाणून घ्या

गाणी ऐकत झोपणं हानिकारक की फायदेशीर?, जाणून घ्या

Next

(Image Credit : dreams.co.uk)

म्युझिक म्हणजे अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय. कदाचितच अशी एखादी व्यक्ती असेल जिला म्युझिक आवडत नसेल. आता तर म्युझिक थेरपीचा वापर करून रूग्णांना ऑल्टरनेट ट्रिटमेंट देण्याचे प्रयोगही करण्यात येत आहेत. एखादं फेवरेट गाणं दिवसभर ऐकलं तरिही आपल्याला त्याचा कंटाळा येत नाही. अनेकदा तर आपण ते गाणं ऐकतच झोपून जातो. झोपण्यापूर्वी अनेक व्यक्ती लाइट म्युझिक ऐकणं पसंत करतात. ज्यामुळे दिवसभराचा ताण, थकवा दूर होऊन रिलॅक्स होण्यास मदत होते. तसेच झोपही छान लागते. पण अनेकांच्या मनात एक प्रश्न गोंधळ घालत असतो. तो म्हणजे गाणं ऐकत असताना झोपणं फायदेशीर आहे का? यामुळे शरीरावर काही विपरीत परिणाम तर होत नाहीत ना?  

इअरफोन लावून झोपणं घातक 

संशोधनानुसार, तुम्ही जर झोपण्यापूर्वी गाणं ऐकत कानांमध्ये इअरफोन लावून झोपलात तर ते तुमच्यासाठी फार घातक ठरतं. असं करणं अगदीचं जीवघेणं ठरत नाही परंतु या सवयीमुळे तुम्हाला चांगल्या झोपेपासून वंचित राहावं लागू शकतं. अनेक दिवसांपासून असं सांगण्यात येतं की, म्यूझिकची सूदिंग म्हणजे त्यामध्ये असलेली मन शांत करणारी आणि ताण दूर करणारी आरामदायी क्वॉलिटी होय. जी चांगली झोप लागण्यासाठी फायदेशीर ठरते. परंतु आपण हे विसरून जातो की, आपल्या शरीराचं एक वेगळं घड्याळ असतं. ज्याला 'सरकॅडियन रिदम' असं म्हणतात. आपल्याला हे फॉलो करणं अत्यंत गरजेचं असतं. अशातच आपण जर आपल्या शरीराला अन्य एखाद्या साउंडवर अवलंबून ठेवत असू तर ते आरोग्यासाठी पूर्णपणे नुकसानदायी ठरतं. जर तुम्हाला नियमितपणे आर्टिफिशिअल साउंड ऐकून झोपण्याची सवय झाली असेल, तर ही सवय तुमच्यासाठी घातक ठरू शकते. 

अॅक्टिव्ह मोडमध्ये असतं ब्रेन 

म्युझिक ऐकल्यामुळे अनेकदा आपल्या झोपेवर परिणाम होतो. कारण म्युझिक ऐकण्यासाठी आपण आपल्या स्मार्टफोनचा वापर करतो. ज्यामुळे आपला फोन पूर्णवेळ आपल्याजवळच असतो. एवढेच नव्हे तर आराम करताना आणि झोपतानाही आपला फोन आपल्या जवळच राहतो. यामुळे आपल्या ब्रेन रेस्ट करण्याच्यावेळीही अॅक्टिव्ह मोडमध्ये राहतो आणि त्याला आराम मिळत नाही. 

(Image Credit : Mental Floss)

कानांवरही होतो परिणाम

जेव्हा तुम्ही म्युझिक ऐकतानाच झोपून जाता, तेव्हा ब्रेन पूर्णपणे झोपत नाही. ज्यामुळे झोप व्यवस्थित पूर्ण होत नाही आणि तुम्ही मध्यरात्रीच झोपेतून जागे होता. तुम्हाला शरीराला आवश्यक असणारी 8 तासांची झोप मिळू शकत नाही आणि हृदयाचे ठोके नॉर्मलपेक्षा जास्त जोरात पडू लागतात, जे आरोग्यासाठी हानिकारक ठरतात. झोपताना इअरफोन लावल्यामुळे तुमचे कान डॅमेज होऊ शकतात. जर हाय वॉल्यूममध्ये म्युझिक सुरू असतानाच झोपून गेलात तर शरीराला अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. झोपताना कानात इअरफोन लावल्यामुळे कानाच्या त्वचेवर प्रेशर पडतं आणि त्वचेच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. तसेच यामुळे कानामध्ये वॅक्स तयार होतं आणि ऐकण्याची क्षमतादेखील कमी होते. 
 
म्हणजे म्युझिक ऐकणं बंद करणं गरजेचं आहे का?

रात्रीची झोप पूर्ण आणि शांत घेणं हे प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्यासाठी आवश्यक असतं. जर म्युझिक ऐकताना तुम्हाला चांगली झोप येत असेल तर तुम्ही अवश्य ऐका परंतु कानांमध्ये इअरफोन लावून झोपणं टाळा. कारण हे आरोग्यासाठी हानिकारक ठरतं. झोपताना फोन तुमच्यापासून लांब ठेवा आणि कमी आवाजात रेडिओवर म्युझिक ऐका. यामुळे तुमच्या बॉडिच्या नॅचरल स्लीपिंग पॅटर्नवर परिणाम होणार नाही. हे लक्षात घेणं गरजेचं आहे की, म्युझिक आपला ताण कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतं. ज्यामुळे तुम्हाला झोप येते. परंतु यामुळे तुम्हाला शांत झोप येऊ शकत नाही. त्यामुळे झोपण्यासाठी म्युझिकवर अवलंबून न राहता अशी सवयींपासून दूर रहा. 

Web Title: is it safe to sleep while listening to music know all details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.