उन्हाळ्यात कोमट पाणी पिणं फायदेशीर की नुकसानकारक? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2024 03:05 PM2024-03-04T15:05:51+5:302024-03-04T15:06:22+5:30

कोणत्याही ऋतुंमध्ये तुम्ही सकाळी कोमट पाणी पिऊ शकता. ज्यामुळे तुम्हाला फायदे मिळतात.

Health tips : Can we drink hot water in summer | उन्हाळ्यात कोमट पाणी पिणं फायदेशीर की नुकसानकारक? जाणून घ्या...

उन्हाळ्यात कोमट पाणी पिणं फायदेशीर की नुकसानकारक? जाणून घ्या...

Best Way To Drink Lukewarm Water : सकाळी कोमट पाणी पिण्याचे अनेक फायदे तुम्हाला माहीत आहेतच. पण उन्हाळ्यात सुद्धा सकाळी कोमट पाणी प्यावं की नाही? यावर एक्सपर्ट सांगतात की, कोणत्याही ऋतुंमध्ये तुम्ही सकाळी कोमट पाणी पिऊ शकता. ज्यामुळे तुम्हाला फायदे मिळतात. फक्त ते कसं प्यावं याची पद्धत तुम्हाला माहीत असायला हवी आणि त्याचे फायदे काय होतात हेही माहीत असायला हवे. चला तर जाणून घेऊ...

कोमट पाणी पिण्याचे फायदे?

कोविड, इंफ्लूएंजा व्हायरसचा धोका आणि लक्षणांना दूर ठेवण्यासाठी एक मजबूत मेटाबॉलिज्म आणि इम्यून सिस्टीम बनवणं गरजेचं आहे. सकाळी कोमट पाणी प्यायल्याने शरीरात इलेक्ट्रोलाइटचं  संतुलन बनवून ठेवण्यास मदत मिळते. तसेच शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासही मदत मिळते. त्याशिवाय सर्दी, खोकला, इन्फेक्शन याही समस्या दूर होतात. 

बॉडी डिटॉक्स

छातीतमध्ये दाटलेपणा कफ झाल्यामुळे होतो. याने फुप्फुसाचे वायुमार्ग ब्लॉक होतात. अशात कफ पातळ करण्यासाठी आणि तो शरीरातून बाहेर काढण्यासाठी सगळ्यात चांगला उपाय म्हणजे सकाळी कोमट पाणी पिणे हा आहे. तसेच कोमट पाण्याने घशाची खवखव आणि सायनसची समस्याही दूर होते. चला आता हे पाणी पिण्याची पद्धत जाणून घेऊ.

1 लिटर कोमट पाणी घ्या

त्यात 1 लिंबू पिळा

2 चमचे मध टाका

हे चांगलं मिक्स करा आणि दिवसभर घोट घोट करून हे पाणी प्या.

मध आणि लिंबू दोन्हीमध्ये व्हिटॅमिन सी, डी, ई, के आणि बी कॉम्प्लेक्स आणि बीटा-कॅरोटीनसारखे पोषक भरपूर असतात. जे सर्दी, खोकला आणि फ्लूच्या उपचारासोबतच इम्यूनिटी वाढवण्यास मदत करतात.

Web Title: Health tips : Can we drink hot water in summer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.