​HEALTH : ‘हा’ व्यायामप्रकार केल्यास लाभते दिर्घायुष्य !

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2017 12:11 PM2017-11-23T12:11:53+5:302017-11-23T17:41:53+5:30

प्रत्येक व्यायामप्रकाराचा आपल्या शरीरावर सकारात्मक परिणाम होत असतो. त्यातच पुश-अप हा व्यायामप्रकार अतिशय प्रभावी असून हा यामुळे दिर्घायुष्य लाभते असे संशोधनात म्हटले आहे.

HEALTH: Benefits of Long-Term Life! | ​HEALTH : ‘हा’ व्यायामप्रकार केल्यास लाभते दिर्घायुष्य !

​HEALTH : ‘हा’ व्यायामप्रकार केल्यास लाभते दिर्घायुष्य !

Next
ong>-रवींद्र मोरे 
बहुतांश सेलिब्रिटी फिट राहण्यासाठी नियमित व्यायाम करतात. व्यायामाचे महत्त्व लक्षात घेता ते आपल्या व्यस्त शेड्यूलमधुनही व्यायामासाठी पुरेसा वेळ काढतात आणि वेगवगळ्या व्यायामप्रकाराने स्वत:ला फिट ठेवतात. व्यायामाने आपल्या शरीरवर काय परिणाम होतो, याविषयी आजपर्यंत बरेच संशोधन झाले आहे. प्रत्येक व्यायामप्रकाराचा आपल्या शरीरावर सकारात्मक परिणाम होत असतो. त्यातच पुश-अप हा व्यायामप्रकार अतिशय प्रभावी असून हा यामुळे दिर्घायुष्य लाभते असे संशोधनात म्हटले आहे. 

उत्तम आरोग्याची त्रिसूत्री म्हणजे सकस आहार, पुरेशी विश्रांती आणि आवश्यक व्यायाम होय. त्यात नियमित व्यायाम करणारे इतरांपेक्षा अ‍ॅक्टिव असतात. मात्र आॅस्ट्रेलियातील युनिव्हर्सिटी आॅफ सिडनीमधील संशोधकांनी केलेल्या संशोधनानुसार, पुश-अप्स व सिट-अप्ससारखे व्यायामप्रकार नियमित केल्यास अपमृत्यूचा धोका टळतो आणि दिर्घायुष्य लाभते, असे सिद्ध झाले आहे. या संशोधनात तब्बल ८० हजारांहून अधिक नागरिकांच्या जीवनशैलीचा अभ्यास करण्यात आला, त्यात त्यांची दिनचर्येचा, ते करीत असलेल्या व्यायामपद्धतीचा व त्यांच्या आरोग्याचा आढावा घेण्यात आला. पुश-अप्स व सिट-अप्स या प्रकारचा व्यायाम करणारे नागरिक अधिक निरोगी असतात. तसेच, या व्यायामामुळे त्यांना असलेल्या अपमृत्यूच्या धोक्यात २३ टक्क्यांनी घट होते. एवढेच नाही तर कर्करोगामुळे होणाºया मृत्यूंचे प्रमाणही या व्यायामामुळे ३१ टक्के घटते, असे निरीक्षण या अभ्यासात नोंदविले आहे.

जॉगिंग, सायकलिंग अथवा अ‍ॅरोबिक आदी प्रकार निरोगी राहाण्यासाठी आवश्यक असतातच. मात्र स्नायुंना बळकटी देणारे पुश-अप्स व सिट-अप्ससारखे व्यायामप्रकार अधिक महत्त्वाचे ठरतात. या व्यायामप्रकारांमुळे अपमृत्यू तसेच कर्करोगाचा धोकाही टळू शकतो, अशी माहिती या विद्यापीठातील संशोधक एमॅन्युएल स्टॉमॅटॅकिस यांनी दिली. 

व्यायामशाळेमध्ये जाऊन वजनी उपकरणे अथवा अन्य माध्यमांच्या साह्याने व्यायाम करण्याकडे अनेकांचा कल असतो. मात्र केवळ आपल्याच शरीराचा वापर करून म्हणजे पुश-अप्स, सिट-अप्ससारख्या प्रकारही व्यायामशाळेतील व्यायामाएवढेच लाभदायी ठरतात, असे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. अमेरिकन जर्नल आॅफ एपिडेमिओलॉजीमध्ये हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. 

Web Title: HEALTH: Benefits of Long-Term Life!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.