लाल की हिरवी...कोणती भेंडी आरोग्यासाठी जास्त फायदेशीर? एक्सपर्टने सांगितलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 09:15 AM2023-06-21T09:15:15+5:302023-06-21T09:15:36+5:30

Green vs Red Lady Finger: हिरवी भेंडी तर तुम्ही अनेकदा खाल्ली असेल, पण लाल भेंडी तुम्ही पाहिली का? हिरव्या भेंडीसोबत लाल भेंडीही बाजारात मिळते. पण याचं उत्पादन कमी होतं. त्यामुळे ती जरा महाग असते.

Green or Red Which lady finger is best for your health | लाल की हिरवी...कोणती भेंडी आरोग्यासाठी जास्त फायदेशीर? एक्सपर्टने सांगितलं उत्तर

लाल की हिरवी...कोणती भेंडी आरोग्यासाठी जास्त फायदेशीर? एक्सपर्टने सांगितलं उत्तर

googlenewsNext

Green vs Red Lady Finger :  ताज्या भाज्या खाणं आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे तुम्ही डॉक्टरांकडून नेहमीच ऐकलं असेल. या भाज्यांमधून आपल्या शरीराला अनेक पोषक तत्व मिळतात आणि आपलं आरोग्य चांगलं राहतं. अनेक भाज्या तर लोकांना आवडत नाही तरीही त्यांच्या फायद्यामुळे त्या खाव्या लागतात. हिरवी भेंडी तर तुम्ही अनेकदा खाल्ली असेल, पण लाल भेंडी तुम्ही पाहिली का? हिरव्या भेंडीसोबत लाल भेंडीही बाजारात मिळते. पण याचं उत्पादन कमी होतं. त्यामुळे ती जरा महाग असते.

कोणती भेंडी जास्त फायदेशीर?

आता ज्यांनी लाल आणि हिरवी भेंडी पाहिली असेल त्यांच्या मनात नक्कीच हा प्रश्न उपस्थित झाला असेल की, हिरव्या आणि लाल भेंडीपैकी कोणती भेंडी जास्त फायदेशीर राहते? 

प्रसिद्ध डायटीशिअन आयुषी यादव (Ayushi Yadav) यांनी सांगितलं की, 'लाल भेंडीला काशी लालिमा भेंडी असंही म्हटलं जातं. कारण काही वर्षाआधी वाराणसीच्या इंडियन इंस्टीट्यूट ऑफ व्हेजिटेबल्सने तयार केली होती. ज्या सायंटिस्टने ही भेंडी डेव्हलप केली होती, त्यांचं मत होतं की, लाल भेंडी हिरव्या भेंडीपेक्षा पौष्टिक आहे'.

सामान्य भेंडीचा रंग क्लोरोफिलमुळे हिरवा असतो. त्याचप्रमाणे लाल भेंडीचा रंग एंथोसायनिन (Anthocyanin) नावाच्या पिगमेंटमुळे लाल असतो. दावा केला जातो की, हिरव्या भेंडीच्या तुलनेत लाल भेंडी खाल्ल्याने शरीरात 30 टक्के हीमोग्लोबिन आणि आयरन वाढतं. असं मानलं जातं की, लाल भेंडीमध्ये कॅल्शिअम आयर आणि अॅंटी-ऑक्सिडेंटही जास्त असतात.

लाल भेंडीचे फायदे

1) लाल भेंडीमध्ये व्हिटॅमिन बी आणि फोलेटचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे ही भेंडी प्रेग्नेंट महिलांसाठी फार फायदेशीर मानली जाते.

2) जे लोक लाल भेंडी जास्त खातात त्यांना टाइप 2 डायबिटीस होण्याचा धोकाही कमी राहतो. कारण या भेंडीने ब्लड शुगर लेव्हल कमी करू शकते.

3) ज्या लोकांना हार्ट डिजीजचा धोका असतो त्यांना लाल भेंडी नक्की खावी. कारण याने कोलेस्ट्रॉल आणि ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यास मदत मिळते.
 

Web Title: Green or Red Which lady finger is best for your health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.