'हा' खेळ खेळणाऱ्या लोकांचं आयुष्य जास्त असतं!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2018 11:57 AM2018-09-11T11:57:04+5:302018-09-11T11:59:45+5:30

चांगल्या आरोग्यासाठी एक्सरसाईज किती महत्त्वाची आहे. पण हा एक खेळ सर्वात बेस्ट आहे असं काही समोर आलेलं नव्हतं. मात्र आता अशी माहिती समोर आली आहे की, एक असा खेळ आहे ज्याने तुमचं आयुष्य वाढण्यास मदत होते. 

Exercise and social activity is good for longer life | 'हा' खेळ खेळणाऱ्या लोकांचं आयुष्य जास्त असतं!

'हा' खेळ खेळणाऱ्या लोकांचं आयुष्य जास्त असतं!

Next

हे सर्वांनाच माहीत आहे की, चांगल्या आरोग्यासाठी एक्सरसाईज किती महत्त्वाची आहे. पण हा एक खेळ सर्वात बेस्ट आहे असं काही समोर आलेलं नव्हतं. मात्र आता अशी माहिती समोर आली आहे की, एक असा खेळ आहे ज्याने तुमचं आयुष्य वाढण्यास मदत होते. 

नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार, स्पोर्ट्स गेम्समुळे मृत्यूचा धोका ४७ टक्के कमी होतो. सॅंट ल्यूक्स हेल्थ सेंटर कंसासच्या अभ्यासात ८५७७ वयस्कांना सहभागी करुन घेण्यात आले होते. हे लोक जवळपास २५ वर्ष या अभ्यासाचा भाग होते.

या अभ्यासातून असे समोर आले आहे की, जे लोक टेनिससारखा खेळ खेळतात, त्यांचं आयुष्य एक्सरसाईज न करणाऱ्या लोकांपेक्षा अधिक असतं. इतकेच नाही तर त्यांचं आयुष्य जॉगिंग, स्वीमिंग आणि सायकलिंगसारख्या सोलो अॅक्टिव्हीटीज करणाऱ्या लोकांपेक्षाही जास्त असते. (हे पण वाचा : जिम जॉइन करण्यापूर्वी या गोष्टींची घ्या काळजी!)

या अभ्यासातून हे समोर आले की, जर तुम्ही एक्सरसाईजसोबतच सोशल इंटरॅक्शनही करता तर याचा फायदा दुप्पट होतो. या अभ्यासाशी संबंधित अभ्यास ऑथर जेम्स यांनी सांगितले की, एक्सरसाईज करणे आणि हार्ट रेट वाढवणे फायदेशीर आहे. पण लोकांसोबत कनेक्ट होणंही तितकंच गरजेचं आहे.

त्यांनी सांगितले की, जे लोक सायकल चालवतात त्यांनी जर कामही ग्रुपमध्ये केलं तर फायदा जास्त होतो. मजेदार बाब ही आहे की, या अभ्यासाला ब्रिटीश मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित एका जुन्या अभ्यासाचाही दुजोरा मिळतोय. या जुन्या अभ्यासातून असे समोर आले की, जे लोक रॅकेट गेम्स(बॅडमिंटन, टेनिस इ.) खेळतात त्यांचं आयुष्य जॉगिंग करणाऱ्यांपेक्षा अधिक असतं. (हे पण वाचा : व्यायाम न करणाऱ्यांनो सावधान! जागतिक आरोग्य संघटनेचा 1.4 अब्ज लोकांना इशारा)

वेगवेगळे खेळ खेळणाऱ्या लोकांमध्ये आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे की, जे लोक फिजिकल स्पोर्ट किंवा तशा कोणत्याही अॅक्टिव्हिजमध्ये सहभागी होत नाहीत, त्यांचा मृत्यू कमी वयात होण्याची शक्यता जास्त असते.

Web Title: Exercise and social activity is good for longer life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.