फुट कॉर्न्स म्हणजे काय? 'असा' करा उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2018 06:05 PM2018-11-30T18:05:27+5:302018-11-30T18:06:00+5:30

फुट कॉर्न्स म्हणजे मोठ्या पांढऱ्या, गोल आकाराच्या मृत त्वचेची गाठ. अनेकदा ही गाठ पायांच्या बोटांवर, तळव्यांवर तयार होते. यामुळे लोकांना वेदनांचाही सामना करावा लागतो.

effective home remedies for corns and calluses | फुट कॉर्न्स म्हणजे काय? 'असा' करा उपाय!

फुट कॉर्न्स म्हणजे काय? 'असा' करा उपाय!

googlenewsNext

फुट कॉर्न्स म्हणजे मोठ्या पांढऱ्या, गोल आकाराच्या मृत त्वचेची गाठ. अनेकदा ही गाठ पायांच्या बोटांवर, तळव्यांवर तयार होते. यामुळे लोकांना वेदनांचाही सामना करावा लागतो. वेळीच यावर काही उपचार केले नाही तर हळूहळू ही समस्या वाढू लागते. या समस्येपासून सुटका करण्यासाठी खरं तर एक छोटसं ऑपरेशन करण्यात येतं पण लोक घाबरून ते करणं टाळतात आणि त्यावर उपाय म्हणून बाजारात मिळणाऱ्या क्रिम्स आणि फुट कॉर्न्स बँडचा वापर करतात. परंतु याचा फुट कॉर्न्सच्या समस्येवर फारसा परिणाम होत नाही. आज आपण फुट कॉर्न्सच्या समस्येवर उपायकारक ठरणाऱ्या काही घरगूती उपायांबाबत जाणून घेऊया...

फुट कॉर्न होण्याची कारणं :

  • टाइट शूज वापरणं
  • हाय हिल्सचा वापर करणं  
  • सतत खूप वेळ उभं राहिल्यामुळे 
  • मौजे न वापरता शूज वापरणं
  • चप्पल न घालता सगळीकडे फिरणं

 

घरगुती उपाय करण्याआधी लक्षात घ्या या गोष्टी :

जर तुम्ही घरगुती उपायांनी फुट कॉर्न्सची समस्या दूर करण्याचा विचार करत असाल तर कोणताही उपाय करण्याआधी मीठाच्या पाण्याने पाय व्यवस्थित धुवून घ्या. धुतल्यानंतर पाय व्यवस्थित सुकवून घ्या. त्यानंतरच उपाय करा. 

घरगुती उपाय फुट कॉर्न्स दूर करण्यासाठी :

जेष्टमध - 

रात्री 1 चमचा जेष्टमधामध्ये मोहरीचं तेल एकत्र करून पेस्ट तयार करा. तयार पेस्ट फुट कॉर्न्सवर लावा. त्यानंतर यावर पट्टी बांधून रात्रभर तसचं ठेवा. सकाळी पट्टी काढून कोमट पाण्याने धुवून घ्या. जोपर्यंत कॉर्न्सचा आकार छोटा आणि त्वचा नरम होत नाही तोपर्यंत हा उपाय करा. 

टी ट्री ऑइल -

टी ट्री ऑइलमध्ये अॅन्टी-फंगल आणि अॅन्टी-बॅक्टेरिअल गुणधर्म असतात. जे फुट कॉर्न्सवर उपाय म्हणून उपयुक्त ठरतात. लसणाच्या 3 पाकळ्या भाजून त्यामध्ये लवंगाची पावडर एकत्र करून फुट कॉर्न्सवर लावा. वरून पट्टी बांधून रात्रभर तसचं ठेवा. सकाळी कोमट पाण्याने धुवून टाका. 

Web Title: effective home remedies for corns and calluses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.