वर्षभरात ९७७ व्यसनींनी घेतले गावातच उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2020 05:00 AM2020-02-09T05:00:00+5:302020-02-09T05:00:04+5:30

तालुक्यालगत असलेल्या गावांतील व्यसनी रुग्णांना उपचार घेणे यामुळे सोपे झाले. मुक्तिपथ कार्यकर्ते गावागावात दारूविक्री बंद करण्यासाठी गाव संघटनांच्या माध्यमातून प्रयत्न करतानाच व्यसन उपचाराविषयीही माहिती देतात. यातूनच गाव पातळीवरील व्यसन उपचाराची मागणी मुक्तिपथ गाव संघटनांकडून होऊ लागली.

In the year 977 addicts receive treatment in the village | वर्षभरात ९७७ व्यसनींनी घेतले गावातच उपचार

वर्षभरात ९७७ व्यसनींनी घेतले गावातच उपचार

Next
ठळक मुद्देजनजागृती : व्यसन सोडविण्यासाठी गावकऱ्यांचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सर्च मधील मानसिक आरोग्य विभागाद्वारे मुक्तिपथ अभियानाअंतर्गत आठवडी क्लिनिक आणि गावपातळीवर एक दिवसीय शिबिरे घेतली जात आहेत. २०१९ मध्ये वर्षभरात झालेल्या ४७ शिबिरात आजवर तब्बल ९७७ व्यसनींवर गावातच उपचार झाला आहे. विशेष म्हणजे यात केवळ पुरुषांनीच नाही तर काही महिलांनीही उपचार घेतला.
दारूचे व्यसन हा आजार आहे आणि उपचाराने तो बरा होतो. त्यामुळे अशा व्यसनींवर उपचारासाठी सर्चमध्ये मानसिक आरोग्य विभागांतर्गत काही वर्षांपासून १२ दिवसीय निवासी शिबिर सर्चमध्ये घेतले जाते. हे शिबिर दारूच्या आहारी गेलेल्या व्यसनींसाठी असते. पण दारूचे व्यसन असलेल्या २० टक्के लोकांनाच रुग्णालयात दाखल करण्याची गरज असते. ८० टक्के रुग्ण समुपदेशन व साध्या औषधोपचाराने व्यसनातून बाहेर पडू शकतात. त्यामुळे सर्चद्वारे मुक्तिपथ अंतर्गत गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज, चामोर्शी, अहेरी आणि सिरोंचा या तालुक्यात एक दिवसीय व्यसन उपचार क्लिनिक सुरू करण्यात आले.
तालुक्यालगत असलेल्या गावांतील व्यसनी रुग्णांना उपचार घेणे यामुळे सोपे झाले. मुक्तिपथ कार्यकर्ते गावागावात दारूविक्री बंद करण्यासाठी गाव संघटनांच्या माध्यमातून प्रयत्न करतानाच व्यसन उपचाराविषयीही माहिती देतात. यातूनच गाव पातळीवरील व्यसन उपचाराची मागणी मुक्तिपथ गाव संघटनांकडून होऊ लागली.
मागणी पाहता गावांमध्ये व्यसन उपचार शिबिराचा रितसर ठराव घेऊन एक दिवसीय व्यसन उपचार शिबिरे घेण्यास सुरुवात झाली. त्यामुळे दारू सोडण्याची इच्छा असलेल्या व्यसनींवर गावातच उपचार शक्य होत आहे. सोबतच समुपदेशक सातत्याने व्यसनींच्या संपर्कात राहून मार्गदर्शन करीत असतात. गावाच्या दारूबंदीलाही यामुळे बळ मिळत आहे. २०१९ मध्ये वर्षभरात जिल्ह्यातील बाराही तालुक्यात एकूण ४७ शिबिरे झाली आहेत. यामध्ये देसाईगंज मधील १४१, आरमोरी १३९, कुरखेडा ८४, कोरची ३६, धानोरा ४१, गडचिरोली ७६, चामोर्शी ११३, मुलचेरा ३५, एटापल्ली १९७, भामरगड ६६, अहेरी १७ तर सिरोंचा येथील ३२ अशा एकूण ९७७ गावकऱ्यांनी व्यसन सोडण्यासाठी उपचार घेतला आहे.
सर्च येथील मानसिक आरोग्य विभागाची चमू आणि मुक्तिपथ तालुका कार्यकर्त्यांनी गाव संघटनांच्या सहकार्याने या शिबिरांचे नियोजन केले.

व्यसन उपचार शिबिरात रुग्णांना दारू, तंबाखूच्या सेवनाचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम तसेच कौटुंबिक व सामाजिक स्वास्थ्यावर होणारे परिणाम सांगितले जाते. व्यसनामुळे केवळ शारीरिक नुकसान होत नाही तर आर्थिक नुकसानही होऊन कौटुंबिक घडी विस्कटते, ही बाब बिंबवली जाते.

Web Title: In the year 977 addicts receive treatment in the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य