कत्तलखाण्यात जाणारे जनावरांचे दोन वाहन पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 12:44 AM2018-02-07T00:44:42+5:302018-02-07T00:44:54+5:30

डुग्गीपार पोलिसांनी सोमवारी कत्तल खाण्यात जाणारे जनावरांचे दोन वाहन पकडले. ही कारवाई घोगरा घाट ते कोदामोडी या दरम्यान सोमवारी पहाटे ४.१० वाजता करण्यात आली.

Two vehicles of the slaughtered cattle were captured | कत्तलखाण्यात जाणारे जनावरांचे दोन वाहन पकडले

कत्तलखाण्यात जाणारे जनावरांचे दोन वाहन पकडले

Next
ठळक मुद्देकत्तल खाण्यात जाणारे जनावरांचे दोन वाहन पकडले

ऑनलाईन लोकमत
गोंदिया : डुग्गीपार पोलिसांनी सोमवारी कत्तल खाण्यात जाणारे जनावरांचे दोन वाहन पकडले. ही कारवाई घोगरा घाट ते कोदामोडी या दरम्यान सोमवारी पहाटे ४.१० वाजता करण्यात आली.
पिकअप एमएच ३५-क़े ३४१३ मध्ये चार बैल डांबून नेणाऱ्या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीमध्ये प्रमोद अमोल बिडवाईक (३८) रा. सावरबंध, गंगाधर दुलीचंद सोनवाने (४६) रा. तिडका, कविंद्र रुपचंद सोनुले (२१) रा. तिडका यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या बैलांची किंमत ४० हजार तर पिक-अपची किंमत ३ लाख रुपये सांगितली जाते. दुसरी कारवाई नवेगावबांध रोड कोहमारा टी-पार्इंट येथे करण्यात आली. पिकअप एमएच १०- ए क्यू ७७४१ मध्ये सहा बैल दांबून वाहतूक करित असताना सोमवारच्या पहाटे ३ वाजता पकडण्यात आले. या प्रकरणात आरोपी राजेंद्र माधोराव उंदिरवाडे (३५) रा. पापडा, रामकृष्ण इस्तारी राऊत (५०), रुपेश ग्यानीराम बोरकर (३३) रा. चिचटोला हे तिघेही जनावरांना कत्तल खाण्यात नेत होते. या प्रकरणात जप्त करण्यात आलेल्या जनावरांची किंमत ५५ हजार तर वाहनाची किंमत ४ लाख ५० हजार सांगितली जाते. दोन्ही प्रकरणात डुग्गीपार पोलिसांनी प्राण्यांना निर्दयतेने वागविण्याचा कायदा कलम ११ (१), (ड), (इ) सहकलम ६, ९ महाराष्टÑ पशुसंवर्धन अधिनियम, १८४, मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.२

Web Title: Two vehicles of the slaughtered cattle were captured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.