राणीसती दादींची महिमा अपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 09:46 PM2018-02-11T21:46:38+5:302018-02-11T21:47:27+5:30

देशात मागील हजारो वर्षांपासून अनेको देवी-देवता व संतांच्या अलौकिक चमत्कारांनी भक्तीभाव जागृत ठेवला आहे.

Queen's grandmother's glory is immense | राणीसती दादींची महिमा अपार

राणीसती दादींची महिमा अपार

googlenewsNext
ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : राणीसती मंदिर प्राणप्रतिष्ठा महोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : देशात मागील हजारो वर्षांपासून अनेको देवी-देवता व संतांच्या अलौकिक चमत्कारांनी भक्तीभाव जागृत ठेवला आहे. त्यात झुंझनूची सेठानी व भाविकांची रक्षा करणारी राणीसती दादींची महिमा अपार असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
येथी श्री राणीसती सेवा समितीच्यावतीने आयोजीत श्री राणीसती मंदिर प्राणप्रतिष्ठा महोत्सवात ते बोलत होते. महोत्सात आमदार अग्रवाल यांनी सपत्नीक भेट देऊन राणीसती दादींचे पूजन केले. समितीच्यावतीने आयोजीत या महोत्सवात मुंबई येथील भजन गायक सुदर्शनकुमार व कोलकाता येथील कुवर तेजस राणा यांच्या श्याम भजन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच सौभाग्य उत्सव, मंगलपाठ, बनारस येथील पंडितांकडून दादींची महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी समितीचे अध्यक्ष कैलाशचंद्र रूंगटा, बजरंगलाल टेकडीवाल, रामअवतार अग्रवाल, सचिव मोहन अग्रवाल, गोपाल अग्रवाल, कैलाश थरड, बलदेवप्रसाद अग्रवाल, महावीरप्रसाद अग्रवाल, अशोक अग्रवाल, विजय अग्रवाल, विपीन बावीसी, प्रकाश दावडा, राधिका अग्रवाल, निसा जाजोदिया, रिना अग्रवाल यांच्यासह अन्य समितीचे अन्य पदाधिकारी व भाविक उपस्थित होते.

Web Title: Queen's grandmother's glory is immense

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.