डिमांड भरूनही २८०० शेतकरी वेटिंगवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 12:49 AM2018-10-17T00:49:35+5:302018-10-17T00:50:51+5:30

वीज चोरी व त्यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी महाराष्ट्र वीज वितरण कंपनीकडून शेतकऱ्यांना वीज जोडणी घेण्यासाठी प्रोत्साहीत करण्यात आले. त्यानुसार, जिल्हयातील दोन हजार ७७९ शेतकºयांनी कृषी पंप जोडणीसाठी डिमांड भरले आहे.

Over 2,800 Farmers Waiting Even By Demand Filling | डिमांड भरूनही २८०० शेतकरी वेटिंगवर

डिमांड भरूनही २८०० शेतकरी वेटिंगवर

Next
ठळक मुद्देकंत्राटदारांकडून निविदाच नाहीत : महावितरण आले अडचणीत

कपिल केकत।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : वीज चोरी व त्यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी महाराष्ट्र वीज वितरण कंपनीकडून शेतकऱ्यांना वीज जोडणी घेण्यासाठी प्रोत्साहीत करण्यात आले. त्यानुसार, जिल्हयातील दोन हजार ७७९ शेतकºयांनी कृषी पंप जोडणीसाठी डिमांड भरले आहे. मात्र मागील दोन वर्षांपासून या शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्यात आली नसल्याने ते वेटींगवर आहेत.
विशेष म्हणजे, महावितरणने या कामासाठी कित्येकदा निविदा काढली. मात्र त्यात कंत्राटदारांकडून निविदा टाकण्यात आली नाही. यामुळे वीज जोडणी करून देण्याची इच्छा असतानाही महावितरणची अडचण झाली आहे.
जिल्ह्यातील शेतीला मागील काही वर्षांपासून निसर्गाची फटका सहन करावा लागत आहे. यात एका पाण्याअभावी पीक हातून गेल्याचे चित्रही कित्येकदा बघावयास मिळाले आहे. अशात सिंचनाची मदत घेऊन पीक वाचविण्याची पाळी शेतकºयांवर येते.
विहिरीचे पाणी घेण्यासाठी कृषी पंपाची गरज असते. मात्र ज्यांच्याकडे कृषी पंप नाही असे शेतकरी अवैधरित्या जोडणी घेऊन पाण्याची सोय करतात. हा प्रकार कित्येकदा त्यांच्याच अंगलट येत असल्याचेही प्रकार घडतात.
यामुळेच महावितरणकडून शेतकºयांना स्वत:च्या हक्काचे कनेक्शन घेण्यासाठी प्रोत्साहीत करण्यात आले. महावितरणचा हा सौदा फायद्याचा असल्याने शेतकºयांनीही हक्काच्या कनेक्शनसाठी महावितरणकडे अर्ज केले.
त्यानुसार, मागील दोन वर्षांपासून महावितरणकडे सुमारे दोन हजार ७७९ अर्ज डिमांड भरलेले आहेत. या शेतकºयांना कृषी पंप जोडणी दिली जावी, यासाठी महावितरणने कित्येकदा निविदा काढली. मात्र कंत्राटदारांकडून निविदा टाकण्यात आल्या नाहीत. अशात इच्छा असूनही महावितरणकडून जोडणी करण्यात आली नाही. परिणामी डिमांड भरूनही जिल्ह्यातील दोन हजार ७७९ शेतकरी वेटींगवरच आहेत.

उच्चदाब वितरण प्रणालीचा (एचडिव्हीएस) योजनेला सुरूवात
शेतकºयांना योग्य दाब व अखंडीत वीज पुरवठा मिळावा यासाठी महावितरणकडून उच्चदाब वितरण प्रणाली (एचहिडीएस) योजना राबविली जाणार आहे. यासह अन्य २ योजनांचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंगळवारी (दि.१६) करण्यात आला. यात, उच्चदाब वितरण प्रणाली या योजनेची जिल्ह्यातही सुरूवात करण्यात आला असून गोरेगाव तालुक्यातील ग्राम झांजीया येथील शेतकरी जियालाल गणपत चन्ने यांना पहिले कनेक्शन देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या कामांसाठी कंत्राटदाराला कार्यादेश देण्यात आले असून आता कृषी पंप वीज जोडणीचे काम गती घेणार असल्याचे दिसत आहे.

Web Title: Over 2,800 Farmers Waiting Even By Demand Filling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.