महावितरणने वीज चोरांवर आवळला कारवाईचा फास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 09:31 PM2018-10-15T21:31:32+5:302018-10-15T21:32:20+5:30

वीज चोरीच्या प्रकारांवर अंकुश बसावा यासाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून जिल्ह्यात सातत्याने मोहिम राबविली जात आहे. यांतर्गत महावितरणने जिल्ह्यात वीज चोरीचे ३९० प्रकरण नोंद केले आहेत. विशेष म्हणजे, यातील २३१ प्रकरणांत वीज विभागाने ३२.२० लाखांची वसुली केली आहे. वीज वितरण कंपनीसाठी वीज चोरी ही एक गंभीर समस्या झाली आहे.

MSEDCL has taken action against power thieves | महावितरणने वीज चोरांवर आवळला कारवाईचा फास

महावितरणने वीज चोरांवर आवळला कारवाईचा फास

Next
ठळक मुद्देवीज चोरीची ३९० प्रकरणे : ३२.२० लाखांची वसुली

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : वीज चोरीच्या प्रकारांवर अंकुश बसावा यासाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून जिल्ह्यात सातत्याने मोहिम राबविली जात आहे. यांतर्गत महावितरणने जिल्ह्यात वीज चोरीचे ३९० प्रकरण नोंद केले आहेत. विशेष म्हणजे, यातील २३१ प्रकरणांत वीज विभागाने ३२.२० लाखांची वसुली केली आहे. वीज वितरण कंपनीसाठी वीज चोरी ही एक गंभीर समस्या झाली आहे.
यामुळे गोंदिया जिल्हा वरिष्ठांच्या नेहमीच नजरते राहतो. याकडे लक्ष देत जिल्ह्यात सातत्याने वीज चोरी करणाऱ्यांवर कारवाही केली जात आहे. जिल्ह्यात एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांत ९० लाख २५ हजार ९२४ युनिट म्हणजेच ४६ लाख ८७ हजार रूपयांची वीज चोरी झाल्याची माहिती आहे.
यात गोंदिया विभागात ८८ लाख ३१ हजार ७१६ युनिट वीज चोरी झाली आहे. तर देवरी विभागात १ लाख ९४ हजार २०८ युनिट वीज चोरी झाली आहे. वीज वितरण कंपनीने राबविलेल्या मोहिमांदरम्यान वीज चोरीचे ३९० प्रकरण नोंद केले आहेत.
यातील २३१ प्रकरणांतील ४ लाख २८ हजार ५३६ युनिटच्या चोरीची ३२.२० लाखांची रक्कम वसूल करण्यात आली आहे.
वीज चोरीवर आळा बसावा यासाठी वीज कंपनीकडून कित्येक जागांवर एरीअर बंच केबल टाकण्यात आले आहेत.
तसेच भरारी पथक कारवाया करीत असताना येथील कर्मचारी मोहिमांत भाग घेत आहेत.
१९ अवैध कनेक्शन पकडले
महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ५६९ वीज कनेक्शन्सची तपासणी केली. यातील १९ प्रकरणांत कनेक्शन अवैध असल्याचे स्पष्ट झाले आहे. या कनेक्शनधारकांकडून ३२ हजार १९ युनिट वीज चोरी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यातील ५ कनेक्शनधारकांकडून ३ हजार ७६ युनिटची रक्कम वसुल करण्यात आली आहे.
आकडा टाकून १०.२१ लाखांची वीज चोरी
जिल्ह्यात आकडा टाकून मोठ्या प्रमाणात वीज चोरी केली जाते. मागील ६ महिन्यांत ६११ कनेक्शनची तपासणी केली असता त्यात २३९ प्रकरणांत आकडा टाकून वीज चोरी केल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी १ लाख ३५ हजार ७७२ युनिटची १०.२१ लाखांची वीज चोरी केली. यातील ६.२१ लाख रूपये संबंधींताक डून भरण्यात आले असून ४ प्रकरणांत मात्र पोलीस तक्रार करण्यात आली आहे.
मीटरमध्ये छेडछाडची १४० प्रकरणे
वीज बिल कमी यावे यासाठी मीटरमध्ये छेडछाड करण्यात आल्याचे गोंदिया विभागात ८३ तर देवरी विभागात ५७ प्रकरण नोंद करण्यात आले आहे. त्याचप्रकारे गोंदिया विभागात १८.४१ लाख व देवरी विभागात ९.४५ लाख म्हणजेच एकूण २७.८६ लाख रूपयांची चोरी पकडण्यात आली आहे. यात ४ लाख ५९ हजार २११ युनिट वीज चोरीचे प्रकरण असून ३ लाख ५९ हजार ८६३ युनिटची रक्कम वसुल करण्यात आली आहे.


वीज चोरीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी जिल्ह्यात विशेष मोहिम राबविली जाते. याशिवाय पूर्ण वर्ष वीज चोरी थांबविण्यासाठी प्रत्येकच कर्मचारी काम करतात.
- ओ.के.बारापात्रे, अधीक्षक अभियंता, महावितरण, गोंदिया

Web Title: MSEDCL has taken action against power thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.