Maruti van knocks on Gondia-Balaghat road; Three of a family killed | गोंदिया-बालाघाट मार्गावर मारूती व्हॅनची दुचाकीला धडक; एकाच कुटुंबातील तिघे ठार

ठळक मुद्देरेल्वेस्टेशनवर सोडायला जाताना घडला अपघात

आॅनलाईन लोकमत:
गोंदिया बालाघाट मार्गावर गुरुवारी सकाळी ७.३० च्या सुमारास एका भरधाव वेगाने चाललेल्या मारुती व्हॅनने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील तिघेही जागीच ठार झाले तर व्हॅनमधील एक जण गंभीररित्या जखमी झाला आहे.
गोंदिया जिल्ह्यातील मोरवाही येथील रहिवासी असलेले रमेश लाखन रिनायत (४३), कमलाबाई रिनायत (६५) व राजेश रिनायत (३६) हे तिघे गुरुवारी सकाळी गोंदिया रेल्वेस्थानकाकडे दुचाकीवरून जात असताना समोरून येणाऱ्या मारुती व्हॅनची त्यांना जबरदस्त धडक बसली. यात या तिघांचाही मृत्यू झाला तर व्हॅनमधील एकजण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना सकाळी ७.३० च्या सुमारास घडली.
रमेश व कमलाबाई यांना कळमेश्वरला जायचे असल्याने त्यांना राजेश मोटरसायकलवरून गोंदिया रेल्वे स्टेशनवर सोडण्यासाठी जात असताना हा अपघात घडला.