दिव्यांगांसाठी होणार ग्रामस्तरीय सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 10:09 PM2019-03-25T22:09:06+5:302019-03-25T22:09:20+5:30

होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत दिव्यांग मतदारांना मतदान करणे सुलभ व्हावे यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष प्रयत्न करणे सुरु केले आहे. या निवडणुका ‘दिव्यांग सुलभ निवडणुका’ व्हाव्यात असे निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. त्या दृष्टीने जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांना मतदानाविषयी माहिती देण्यासाठी २६ ते ३० मार्च दरम्यान ग्रामस्तरावर सभांचे आयोजन करण्यात आले आहे.

Gramastari Sabha for Divyanagang | दिव्यांगांसाठी होणार ग्रामस्तरीय सभा

दिव्यांगांसाठी होणार ग्रामस्तरीय सभा

googlenewsNext
ठळक मुद्दे६२०० दिव्यांग मतदार : जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत दिव्यांग मतदारांना मतदान करणे सुलभ व्हावे यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष प्रयत्न करणे सुरु केले आहे. या निवडणुका ‘दिव्यांग सुलभ निवडणुका’ व्हाव्यात असे निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. त्या दृष्टीने जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांना मतदानाविषयी माहिती देण्यासाठी २६ ते ३० मार्च दरम्यान ग्रामस्तरावर सभांचे आयोजन करण्यात आले आहे.
या सभांमध्ये साधनव्यक्ती, शिक्षक, बीएलओ, तलाठी, ग्रामसेवक यांच्या संयुक्त पथकाद्वारे दिव्यांग मतदारांचे समुपदेशन करण्यात येणार आहे. सोबतच ईव्हीएम-व्हीव्हीपॅट यंत्र हाताळण्याचे प्रशिक्षण सुद्धा देण्यात येणार आहे. ज्यामुळे दिव्यांग व्यक्तींना मतदान प्रक्रियेत भाग घेणे सोईचे होणार आहे. अंध मतदारांसाठी बे्रल लिपीतील नमुना मतपत्रिका उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे मतदान केंद्रावर मतदान करतांना ईव्हीएम मशीनच्या उजव्या बाजूला उमेदवारांचा अनुक्रमांक १ ब्रेल लिपीत लिहिलेला आहे, याबाबत जागृती करण्यात येणार आहे.
अंध मतदारांना मतदानाच्या वेळी आपल्या सोबत सोबती नेता येईल. यासाठी सोबत्यांचे घोषणापत्र भरुन द्यावे लागणार आहे. वाचा दोष व कर्णदोष असलेल्या मतदारांना त्यांना समजेल अशा भाषेत निवडणुकीत मतदान करण्याबाबत माहिती समजावून देण्यात येणार आहे. जे मतदार मतदान केंद्रापर्यंत चालत येवू शकत नाहीत अशा ३ ते ५ मतदारांसाठी व्हिलचेअरची व्यवस्था संबंधित ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगर परिषद यांच्यामार्फत करण्यात येईल.
जिल्हयात एकूण ६२०० दिव्यांग मतदार असून या सोई सुविधांचा त्यांना फायदा होणार आहे. दिव्यांग मतदारांची नोंदणी, मतदान केंद्राचा शोध, व्हीलचेअरची मागणी आदी सोयी उपलब्ध करुन घेण्यासाठी पीडब्ल्यूडी अ‍ॅपचा वापर करता येणार आहे. जिल्हयातील सर्व दिव्यांग मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले आहे.

Web Title: Gramastari Sabha for Divyanagang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.