अतिरिक्त घरभाडे भत्त्यासाठी प्राथमिक शिक्षक समिती न्यायालयात जाणार

By admin | Published: July 21, 2014 12:16 AM2014-07-21T00:16:31+5:302014-07-21T00:16:31+5:30

जिल्हा परिषद गोंदिया येथे जि.प.अंतर्गत शिक्षकांच्या समस्या निराकरणासाठी तक्रार निवारण सभेचे आयोजन रविवारला (दि.२०) करण्यात आले होते. सभेत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक

Go to the Primary Teachers' Committee for additional allowance allowance | अतिरिक्त घरभाडे भत्त्यासाठी प्राथमिक शिक्षक समिती न्यायालयात जाणार

अतिरिक्त घरभाडे भत्त्यासाठी प्राथमिक शिक्षक समिती न्यायालयात जाणार

Next

गोंदिया : जिल्हा परिषद गोंदिया येथे जि.प.अंतर्गत शिक्षकांच्या समस्या निराकरणासाठी तक्रार निवारण सभेचे आयोजन रविवारला (दि.२०) करण्यात आले होते. सभेत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने शिक्षकांच्या अनेक समस्या मांडल्या. परंतु मुख्य कार्यपालन अधिकारी गोंदिया यांनी शिक्षकांच्या समस्यांवर तोडगा काढण्याऐवजी ज्या तुमच्या समस्या आहे ते तुम्ही आयुक्त किंवा न्यायालयात जाऊन समस्या सोडवा असे म्हणाले. त्यामुळे शिक्षक समिती न्यायालयात जाणार आहे.
शिक्षकांना अतिरिक्त घरभाडे देणे, एक स्तर पदोन्नतीनुसार पदविधर शिक्षकांना आगावू वेतनवाढ लागू करणे, उच्च शिक्षणाची परवानगी त्वरित देण्यात यावे, उच्च परीक्षेला बसण्याची परवानगी देणे, जिल्हा परिषद शिक्षण विभागावर संघटनेच्या प्रतिनिधी घेण्यात यावे, शालार्थ प्रणालीद्वारे सर्व शिक्षकांना १ तारखेला करावे, सर्व शाळा संगणकीकृत होत नाही तोपर्यंत सर्व शिक्षकांना वेतन पंचायत समिती स्तरावरून आॅनलाईन करावे, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करताना पती-पत्नी एकत्रीकरण व त्यांच्या समस्या जाणून समायोजन करणे, चटोपाध्याय वेतनश्रेणी वाढवणे, आरटीई नुसार चौथी तेथे पाचवी व सातवी तेथे आठवी उघडलेल्या शाळेत त्वरित शिक्षक देणे, आंतरजिल्हा बदली शिक्षकांचे सहाव्या वेतन आयोगाची नोंद करणे, सहाव्या वेतन आयोगाच्या पाचही टप्याची रक्कम जी.पी.एफमध्ये जमा करणे आदी समस्यांवर चर्चा करण्यात आली. सभेत शिक्षकांचे अतिरिक्त घरभाडे भत्ता लागू करणे आणि पदोन्नतीनुसार पदविधर शिक्षकांना आगावू वेतनवाढ लागू करण्यास स्पष्ट नकार देण्यात आला. याकरिता महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा गोंदिया उच्च न्यायालयात दाद मागणार आहे.
सभेत शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष मनोज दीक्षित, महासचिव एल.यू. खोब्रागडे, शेषराव येडेकर, सुरेश रहांगडाले, किशोर डोंगरवार, व्ही.जी. राठोड, डी.एल. गुप्ता, आर.एस. बसोने, संदीप तिडके, एस.सी. पारधी, एन.बी. बिसेन, जी.सी. बघेले, ओमप्रकाश वासनिक, राजेंद्र बोपचे, नरेश बडवाईक, टी.आर. लिल्हारे, के.पी. रहमतकर, चौधरी, आर.वाय. मस्करे, पी.आर. टेंभरे, एस.एम. येडे, बी.आर. दीप उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Go to the Primary Teachers' Committee for additional allowance allowance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.