समाधान सेलमुळे समस्यांचे वेळीच निराकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 12:51 AM2018-07-14T00:51:46+5:302018-07-14T00:54:27+5:30

सततच्या कर्तव्यामुळे तणावाखाली वावरणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या तक्रारी आणि समस्यांचे वेळीच निराकारण व्हावे. त्यांना कुठल्याही अडचणीला सामोरे जावे लागू नये, यासाठी पोलीस मुख्यालयात समाधान सेल तयार करण्यात आले आहे.

Fix solution due to solution cell | समाधान सेलमुळे समस्यांचे वेळीच निराकरण

समाधान सेलमुळे समस्यांचे वेळीच निराकरण

Next
ठळक मुद्देपोलीस विभागाचा उपक्रम : कर्मचाऱ्यांची पायपीट थांबविण्यास मदत, तक्रारी झाल्या कमी

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सततच्या कर्तव्यामुळे तणावाखाली वावरणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या तक्रारी आणि समस्यांचे वेळीच निराकारण व्हावे. त्यांना कुठल्याही अडचणीला सामोरे जावे लागू नये, यासाठी पोलीस मुख्यालयात समाधान सेल तयार करण्यात आले आहे. यावर कर्मचाऱ्यांनी आॅनलाईन तक्रार केल्यास त्याची वेळीच दखल घेवून त्यांचे निराकरण केले जाते. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसून येत आहे.
पोलीस कर्मचाऱ्यांचे जीवन सतत धावपळीचे असते. बरेचदा कर्तव्य बजावताना कुटुंबापासून दूर रहावे लागते. तर कधी विभागातंर्गत येणाऱ्या छोट्या छोट्या अडचणीमुळे पोलीस कर्मचाऱ्यांची गैरसोय होती. त्याचा बरेचदा कर्तव्य बजाविताना परिणाम होतो. तर छोट्या छोट्या तक्रारी करण्यासाठी नेहमीच वरिष्ठांकडे जाणे शक्य होत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये बरेचदा असंतोष निर्माण होतो. यासर्व गोष्टी टाळता याव्या, कर्मचाऱ्यांच्या तक्रारी आणि समस्यांची वेळीच दखल घेवून त्याचा निपटारा करता यावा. यादृष्टीने जिल्हा पोलीस विभागाने समाधान सेल ही आॅनलाईन प्रणाली कार्यान्वीत केली आहे. या प्रणालीमुळे कर्मचाऱ्यांना त्यांची समस्या मांडण्यासाठी इतरत्र कुठेही जाण्याची गरज नाही. विभागातच त्यांच्या समस्यांचे समाधान केले जात आहे. यामुळे वरिष्ठ अधिकारी भेटत नसल्याची व तक्रार ऐकूण घेत नसल्याची ओरड देखील कमी झाली आहे. त्यामुळे विसंवाद दूर होवून संवादाच्या माध्यमातून समस्यांचे निवारण होत असल्याने पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये खेळीमेळीचे वातावरण ठेवण्यास मदत होत आहे. पोलीस विभागाने समाधान सेल सुरू केल्यापासून बऱ्याच समस्यांचे वेळीच निराकरण होत असल्याने पोलीस कर्मचारी समाधानी असल्याचे चित्र आहे.
दिशाभूल टाळण्यास झाली मदत
काही असंतुष्ट कर्मचारी वरिष्ठ अधिकारी तक्रारींची दखल घेत नाही, समस्यांचे वेळीच निराकारण होत नसल्याचे सांगून इतर कर्मचाऱ्यांची दिशाभूल करतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण केले जात होते. तर प्रत्यक्षात वस्तू स्थिती न जाणून घेता विभागावर आरोप केले जातात. मात्र या सर्व गोष्टींवर समाधान सेलमुळे वेळीच मात करणे शक्य झाले.असंतुष्ट कर्मचाºयांकडूृन इतर कर्मचाऱ्यांची होणारी दिशाभूल सुध्दा टळली.
डीजी लोनसाठी सर्वतोपरी मदत
पोलीस कर्मचाऱ्यांचे घरकुलाचे स्वप्न साकारण्यासाठी त्यांना डीजी लोन योजनेतंर्गत कर्ज उपलब्ध करुन दिले. यासाठी अर्ज करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे जोडून प्रकरणे सादर केल्यानंतर त्यांची चाचपणी करुन प्रकरणे मंजूर केली जातात. पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भूजबळ यांनी स्वत: पुढाकार घेवून ३४ कर्मचाऱ्यांची कर्जाची प्रकरणे मंजूर करुन देवून त्यांचे घरकुलाचे स्वप्न साकारण्यास मदत केली.
प्रशिक्षणातून मार्गदर्शन
समाधान सेलकडे आॅनलाईन तक्रारी कशा करायच्या, तसेच समस्या कशा मांडायच्या यासाठी जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना कार्यशाळा घेवून त्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. प्रशिक्षणातून कर्मचाऱ्यांना इतर गोष्टींचे मार्गदर्शन केले जात असल्याने त्यांचे समाधान होत असल्याचे चित्र आहे.

Web Title: Fix solution due to solution cell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस