सालेकसा धान खरेदीची चौकशी अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 09:34 PM2019-07-13T21:34:30+5:302019-07-13T21:35:04+5:30

सालेकसा तालुक्यातील एका सहकारी संस्थेने खरेदी केलेल्या धानापेक्षा संस्थेच्या गोदामात प्रत्यक्षात धान कमी असल्याची तक्रार जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांच्याकडे करण्यात आली होती. त्यानंतर याप्रकरणाची चौकशी मागील दोन महिन्यांपासून सुरू होती.

In the final stage of the procurement process of Salekasa Paddy | सालेकसा धान खरेदीची चौकशी अंतिम टप्प्यात

सालेकसा धान खरेदीची चौकशी अंतिम टप्प्यात

Next
ठळक मुद्देसंडे अँकर । आठवडाभरात येणार अहवाल, धानाची उचल पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सालेकसा तालुक्यातील एका सहकारी संस्थेने खरेदी केलेल्या धानापेक्षा संस्थेच्या गोदामात प्रत्यक्षात धान कमी असल्याची तक्रार जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांच्याकडे करण्यात आली होती. त्यानंतर याप्रकरणाची चौकशी मागील दोन महिन्यांपासून सुरू होती. ही चौकशी आता अंतिम टप्प्यात असून येत्या आठवडाभरात चौकशी अहवाल सादर करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
जिल्ह्यात खरीप आणि रब्बी हंगामात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळातंर्गत धान खरेदी केली जाते. यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन काही ठिकाणी सहकारी संस्थेच्या माध्यमातून केंद्र सुरू करुन धान खरेदी करते. फेडरेशनकडून संस्थाना प्रती क्विंटलवर कमिश्न दिले जाते. मागील खरीप हंगामात सालेकसा येथील सहकारी संस्थेने १ लाख ४० हजार क्विंटल धान खरेदी केली होती. यापैकी ६९ हजार क्विंटल धानाची भरडाईसाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनन उचल केली होती. त्यामुळे उर्वरित धान संस्थेच्या गोदामात शिल्लक असणे आवशक होते. मात्र प्रत्यक्षात संस्थेच्या गोदामात ५० हजार क्विंटल धान कमी असल्याची तक्रार जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांच्याकडे करण्यात आली होती. या तक्रारीची जिल्हाधिकाऱ्यांनी गांर्भियाने दखल घेत संस्थेच्या गोदामाला सिल ठोकून धानाची मोजणी करण्याचे निर्देश दिले होते. यासाठी मार्केटिंग फेडरेशनचे महासंचालक, जिल्हा पुरवठा अधिकारी, जिल्हा मार्केटिंग यांचा समावेश असलेली चौकशी समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने गोदामात नेमके किती धान कमी अथवा बरोबर हे ठरविण्यासाठी धानाची उचल करुन वजन करावे लागेल असे सांगितले होते. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी धानाची उचल करुन वजन करण्याचे निर्देश दिले.त्यानुसार मागील दीड महिन्यापासून गोदामातून धानाची उचल करुन वजन करण्याचे काम सुरू आहे. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून येत्या आठवडाभरात याचा चौकशी अहवाल जिल्हाधिकाºयांकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
सालेकसा येथील सहकारी संस्थेतंर्गत खरेदी करण्यात आलेल्या धान खरेदीत ५० हजार क्विंटल धान कमी असल्याची तक्रार करण्यात आली. त्यानंतर यासंबंधिचे वृत्त देखील प्रकाशित झाले. विधानमंडळात सुध्दा हा प्रश्न उपस्थित करण्यात आला. याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुध्दा दखल घेत त्वरीत चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले. त्यामुळेच या प्रकरणाची चौकशी जलद गतीने करण्यात आली.
तक्रारीवरच प्रश्नचिन्ह
सालेकसा येथील सहकारी संस्थेच्या गोदामात प्रत्यक्षात खरेदी केलेल्या धानापेक्षा गोदामात ५० हजार क्विंटल धान कमी असल्याची तक्रार करण्यात आली. यानंतर जिल्हाधिकाºयांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. चौकशी दरम्यान धानाची मोजणी सुरू असून त्यात धान कमी असल्याचे आत्तापर्यंत आढळले नाही. त्यामुळे या तक्रारीवरच आता प्रश्न चिन्ह उपस्थित होण्याची शक्यता आहे.

सालेकसा येथील धान खरेदी घोळ प्रकरणाची चौकशी अंतीम टप्प्यात आहे. येत्या आठवडाभरात या प्रकरणाचा चौकशी अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येईल.
- सुभाष चौधरी, जिल्हा पुरवठा अधिकारी.

Web Title: In the final stage of the procurement process of Salekasa Paddy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.