शेतकरी पोहोचले तहसील कार्यालयात

By admin | Published: May 23, 2015 01:48 AM2015-05-23T01:48:34+5:302015-05-23T01:48:34+5:30

गेल्या आठ दिवसांपूर्वी भारतीय जनता पार्टीने २५० रुपये बोनस देऊ केले.

The farmer reached the tehsil office | शेतकरी पोहोचले तहसील कार्यालयात

शेतकरी पोहोचले तहसील कार्यालयात

Next

सडक अर्जुनी : गेल्या आठ दिवसांपूर्वी भारतीय जनता पार्टीने २५० रुपये बोनस देऊ केले. पण तालुक्यातील कोहमारा, सडक अर्जुनी, खजरी, परसोडी, डव्वा, कनेरी, दल्ली, मसरामटोला या गावातील आदिवासी विविध सहकारी संस्थेने धान खरेदी केंद्र सुरू केलेच नाही. त्यामुळे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
शेतकऱ्यांचे धान मळणी करुन विकण्यास तयार आहे. पण आदिवासी महामंडळ धान खरेदी करत नसल्यामुळे डुग्गीपार येथील किरण हटवार, मोहन सुरसाऊत यांच्या नेतृत्वात दहा ट्रॅक्टर व शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत सडक अर्जुनीचे तहसीलदार शोभाराम मोटघरे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी नवेगावबांध येथील आदिवासी विकास प्रादेशिक महामंडळ उपप्रादेशिक व्यवस्थापक भागवत, उपदेश कुरसुंगे उपस्थित होते.
कोहमारा आदिवासी सोसायटी परिसरातील शेतकऱ्यांचा शेतमाल डोंगरगाव डेपो या केंद्रावर घेण्याचे आदेश त्वरित देण्यात आले व उद्यापासून त्या केंद्रावर धान खरेदी सुरू केली जाईल असे भागवत यांनी सांगितले. निवेदन देताना पांडुरंग हटवार, सुनील मुगुलमारे, शहारे, लेखलाल टेकाम, अरुन लेदे, महादेव सोनवाने, मोतीराम कापगते, अनिल दीक्षित, वामन सोनवाने, आनंदराव कापगते, मरस्कोल्हे, झाडूजी उईके, पतिराम गोबाळे, अरुण मुंगलमारे, भागवत गजभिये, नंदेश्वर सोनवाने आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: The farmer reached the tehsil office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.