अतिक्रमण हटाव मोहीम फिस्कटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 09:36 PM2019-06-21T21:36:10+5:302019-06-21T21:36:41+5:30

शहरातील वाढत्या अतिक्रमणामुळे शहरवासीय चांगलेच त्रासले असून त्यांच्या धिराचा बांध तुटत असल्याने ते आता नगर परिषदेकडे तक्रारी करीत आहेत. प्राप्त झालेल्या अशा तक्रारींची दखल घेत नगररचना विभागाचे सभापती सचिन शेंडे यांनी शुक्रवारी (दि.२१) अतिक्रमण हटविण्यासाठी मोहीम राबविण्याचे नियोजन केले होते.

Encroachment Removal Campaign Fiscatley | अतिक्रमण हटाव मोहीम फिस्कटली

अतिक्रमण हटाव मोहीम फिस्कटली

Next
ठळक मुद्देपोलीस बंदोबस्त मिळालाच नाही : सभापतींची १ जुलैसाठी तयारी

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरातील वाढत्या अतिक्रमणामुळे शहरवासीय चांगलेच त्रासले असून त्यांच्या धिराचा बांध तुटत असल्याने ते आता नगर परिषदेकडे तक्रारी करीत आहेत. प्राप्त झालेल्या अशा तक्रारींची दखल घेत नगररचना विभागाचे सभापती सचिन शेंडे यांनी शुक्रवारी (दि.२१) अतिक्रमण हटविण्यासाठी मोहीम राबविण्याचे नियोजन केले होते. मात्र पोलीस बंदोबस्त न मिळाल्याने ही मोहीम फिस्कटली.
शहरात अतिक्रमणाने आपले पाय पसरले आहे. परिणामी शहरवासीयांना शहरात वावरने कठीण होत आहे. मध्यंतरी नगर परिषदेने अतिक्रमण काढण्यासाठी चांगली तयारी केली. मात्र ऐनवेळी त्यांची मोहीम फिस्कटली व तिचा आज पत्ताच नाही. मात्र नगर रचना विभागाचे सभापतीपद स्वीकारताच शेंडे यांनी अतिक्रमणाच्या मुद्यावर कारवाई करण्याचे ठरविले आहे. अशात त्यांच्या शहरातून ७० तक्रारी आल्या आहेत. यातील सुमारे ५० अतिक्रमणकर्त्यांना विभागाने नोटीस बजावून आपले अतिक्रमण काढून घेण्याबाबत बजावून मुदत दिली होती. मात्र त्यांच्याकडून अतिक्रमण काढण्यात आले नसल्याने शुक्रवारी (दि.२१) विशेष मोहीम राबविली जाणार होती. यात, मामा चौकातील मुन्ना ठाकूर, देशबंधू वॉर्डात इसरका यांच्या घराजवळ, गौशाल वॉर्ड सावराटोली परिसरात रमेश लारोकर, टॉम जिमजवळ बॉम्बे सोफावाला, बी.एम.पटेल वॉर्ड क्रमांक १० मध्ये एकता अशोक तोलानी, अजय तुरकर, प्रदीप रॉय, लालचंद तुरकर, नर्मदा तुरकर यांच्या अतिक्रमाणाचा समावेश आहे. मात्र ऐनवेळी पोलीस बंदोबस्त न मिळाल्याने ही मोहीम पुढे ढकलण्यात आली आहे. अशात आता १ जुलै रोजी सदर अतिक्रमण काढण्यासाठी तयारी सुरू आहे.

अतिक्रमण निर्मूलन पथकाचे गठन
शहरात अतिक्रमण एक गंभीर समस्या बनले असून नगर परिषदेकडून त्यावर काहीच कारवाई करता येत नसल्याचे दिसत आहे. परिणामी अतिक्रमण करण्याचे प्रकार वाढतच चालले आहेत. यात मात्र शहराचे रूप विस्कटत असून सामान्य नागरिकांची डोकेदुखी वाढत आहे. अशात हे अतिक्रमण काढण्यासाठी अधिकाऱ्यांचे आदेश व त्यानंतर एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याचे प्रकार घडतात. यावर तोडगा म्हणून नगर परिषद हद्दीतील अतिक्रमण काढण्यासाठी अतिक्रमण निर्मुलन पथक तयार करण्याचा प्रस्ताव नगररचना विभागाने मांडला आहे. विशेष म्हणजे, या पथकाला त्वरीत कारवाई करण्याचे संपूर्ण अधिकार प्रदान करण्यात यावे अशी मागणी असून गुरूवारी (दि.२७) होणाºया सर्व साधारण सभेत हा विषय मांडला जाणार आहे.

Web Title: Encroachment Removal Campaign Fiscatley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.