रस्त्यावर दुर्गा, शारदा मांडणाऱ्या आठ मंडळावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 10:16 PM2018-10-24T22:16:52+5:302018-10-24T22:17:16+5:30

भर रस्त्यावर दुर्गादेवीचे मंडप थाटून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाºया आठ मंडळाच्या अध्यक्षांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

Durga, Sharda, on the street, filed a complaint | रस्त्यावर दुर्गा, शारदा मांडणाऱ्या आठ मंडळावर गुन्हा दाखल

रस्त्यावर दुर्गा, शारदा मांडणाऱ्या आठ मंडळावर गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देनियमाचे उल्लघंन केल्याचा ठपका : नोटिसीकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : भर रस्त्यावर दुर्गादेवीचे मंडप थाटून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाºया आठ मंडळाच्या अध्यक्षांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
शहराच्या इंगळे चौकात ३ ते १९ आॅक्टोबर दरम्यान सार्वजनिक दुर्गा मांडून वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे मंडळाचे अध्यक्ष तथा गोंदिया नगर परिषदेचे नगराध्यक्ष अशोक इंगळे (४५) रा. सिव्हील गोंदिया यांच्यावर सरोज घरडे यांच्या तक्रारीवरून गोंदिया शहर पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम २८३, २९१, १८८ सहकलम १०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
कन्हारटोली येथे स्थापन करण्यात आलेल्या दुर्गा देवीचे मंडप नियमाप्रमाणे बनविण्याकरीता १४९ जाफौनुसार नोटीस बजाविण्यात आले होते. परंतु त्या दुर्गा उत्सव समितीने रस्त्याचा एक तृतीयांश भाग रस्त्यावर घेतल्यामुळे त्या मंडळाचे अध्यक्ष बालाजी चुन्नीलाल नागपुरे (४०) रा. कन्हारटोली याच्या विरूध्द भादंविच्या कलम २८३, २९१, १८८ सहकलम १०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुनाटोली येथे स्थापन करण्यात आलेली दुर्गा देवीचे मंडप नियमाप्रमाणे बनविण्याकरीता १४९ जाफौनुसार नोटीस बजावण्यात आले होते.
परंतु त्या दुर्गा उत्सव समितीने रस्त्याचा एक तृतीयांश भाग रस्त्यावर घेतल्यामुळे मंडळाचे अध्यक्ष मोहनलाल अडवानी (२७) रा. पुनाटोली याच्यांविरूध्द भादंविच्या कलम २८३, २९१, १८८ सहकलम १०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
कन्हारटोलीत पुन्हा दुसºया ठिकाणी स्थापन करण्यात आलेल्या दुर्गा देवीचे मंडप नियमाप्रमाणे बनविण्याकरीता १४९ जाफौनुसार नोटीस बजाविण्यात आले होते. परंतु त्या दुर्गा उत्सव समितीने रस्त्याचा एक तृतीयांश भाग रस्त्यावर घेतल्यामुळे त्या मंडळाचा अध्यक्ष कमल कालीपत चक्रवर्ती (५२) याच्याविरूध्द भादंविच्या कलम २८३, २९१, १८८ सहकलम १०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
जय मॉ दुर्गा समिती मामा चौक गोंदिया येथे स्थापन करण्यात आलेली दुर्गा देवीचे मंडप रस्त्यावर उभारण्यात आले. उत्सवापूर्वी पोलिसांनी रस्त्यावर मंडप उभारू नका अशा सूचना केल्या होत्या. परंतु त्यांनी न ऐकता मंडप उभारून वाहतुकीस अडथळा निर्माण केला. त्यामुळे नानू मुदलीयार (५०) रा. मामा चौक गोंदिया याच्याविरूध्द गोंदिया शहर पोलिसांनी भादंविच्या कलम २८३, २९१, १८८ सहकलम १०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
मनोहर चौक शारदा उत्सव मंडळ समिती मनोहर चौक जयस्तंभ चौक गोंदिया येथे स्थापन करण्यात आलेले दुर्गा देवीचे मंडप रस्त्यावर उभारण्यात आले. त्यांनी न रस्त्यावर मंडप उभारून वाहतुकीस अडथळा निर्माण केला. त्यामुळे लाल साकला राठी रा. बजरंग नगर गोंदिया याच्याविरूध्द गोंदिया शहर पोलिसांनी भादंविच्या कलम २८३, २९१, १८८ सहकलम १०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळ गांधी प्रतिमा गोंदिया येथे स्थापन करण्यात आलेल्या दुर्गा देवीचे मंडप रस्त्यावर उभारण्यात आले. उत्सवापूर्वी पोलिसांनी रस्त्यावर मंडप उभारू नका अशा सूचना केल्या होत्या. परंतु त्यांनी न ऐकता मंडप उभारून वाहतुकीस अडथळा निर्माण केला. त्यामुळे सुनील अग्रवाल रा. गांधी प्रतिमा गोंदिया यांच्याविरूध्द गोंदिया शहर पोलिसांनी भादंविच्या कलम २८३, २९१, १८८ सहकलम १०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
भवानी चौक गोंदिया येथे स्थापन करण्यात आलेल्या दुर्गा देवीचे मंडप रस्त्यावर उभारण्यात आले. उत्सवापूर्वी पोलिसांनी रस्त्यावर मंडप उभारू नका अशा सूचना केल्या होत्या. परंतु त्यांनी न ऐकता मंडप उभारून वाहतुकीस अडथळा निर्माण केला. त्यामुळे ईश्वर शिवलानी राठी रा. शंकर चौक सिंधी कॉलनी गोंदिया याच्याविरूध्द गोंदिया शहर पोलिसांनी भादंविच्या कलम २८३, २९१, १८८ सहकलम १०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Durga, Sharda, on the street, filed a complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.