दिव्यांग हा समाजाचा घटक आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 09:39 PM2018-09-17T21:39:37+5:302018-09-17T21:40:03+5:30

दिव्यांग हा समाजाचा घटक आहे. त्यांचा सन्मान व चांगली वागणूक देणे हे प्रत्येकांचे कर्तव्य आहे. सन्मानपूर्वक वागणुकीमुळे त्यांच्यातील न्युनगंड संपुष्टात येऊन त्यांना प्रेरणा मिळते,असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.

Divyang is a community component | दिव्यांग हा समाजाचा घटक आहे

दिव्यांग हा समाजाचा घटक आहे

googlenewsNext
ठळक मुद्देराजकुमार बडोले : दिव्यांगांना साहित्याचे वाटप

लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी मोरगाव : दिव्यांग हा समाजाचा घटक आहे. त्यांचा सन्मान व चांगली वागणूक देणे हे प्रत्येकांचे कर्तव्य आहे. सन्मानपूर्वक वागणुकीमुळे त्यांच्यातील न्युनगंड संपुष्टात येऊन त्यांना प्रेरणा मिळते,असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केटयार्डमध्ये आयोजित दिव्यांग व्यक्तींना नि:शुल्क सहाय्यक उपकरणे वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी अध्यक्षस्थानी गोंदिया परिषदेचे समाज कल्याण सभापती विश्वजीत डोंगरे तर प्रमुख पाहुणे म्हणून पं.स.सभापती अरविंद शिवणकर, कृउबा समितीचे सभापती काशिम जमा कुरेशी, उपसभापती लायकराम भेंडारकर, पं.स.च्या उपसभापती करुणा नांदगावे, जि.प.च्या माजी उपाध्यक्ष रचना गहाणे, भाजपचे तालुकाध्यक्ष उमाकांत ढेंगे, जि.प. सदस्य कमल पाऊलझगडे, मंदा कुंभरे, तेजुकला गहाणे, रघूनाथ लांजेवार, रामदास कोहाडकर, केवलराम पुस्तोडे, चामेश्वर गहाणे, होमराज ठाकरे, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी, उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, समाज कल्याण अधिकारी मिलिंद रामटेके, उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाळे उपस्थित होते.बडोले म्हणाले, जिल्ह्यातील सर्व दिव्यांगांना प्रमाणपत्र देण्याचा महाराष्टÑ शासनाचा पहिला महत्वकांक्षी प्रकल्पाची गोंदियातून सुरुवात झाली आहे.
हा प्रकल्प राज्यभर राबविला जाणार आहे. जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात उपकरणे वितरण शिबिर आयोजित केले असून याद्वारे २३०० दिव्यांगांना तीन चाकी सायकल, कुबडी, श्रवणयंत्र, काठी, स्मार्टफोन यासारखी उपकरणे मोफत दिली जात आहेत.
यासाठी १ कोटी ७२ लक्ष रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. शासनातर्फे १३ दिव्यांग खेळाडूंना नोकरी देण्यात आली. यासारख्या त्यांच्या हिताच्या विविध योजना शासन राबवित आहे. शिक्षण हा महत्वाचा घटक आहे. या क्षेत्रात इमारती, वर्गखोल्या, शिक्षकांची उणीव आहे. शिक्षक मुख्यालयात राहात नाही. अशा अनेक तक्रारी आहेत.
साथीचे आजाराची लागण या दिवसात होते. दिवयांगांचे शिक्षक आपले कर्तव्य चोख बजावत आहेत किंवा नाही. याविषयी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आढावा घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. अनेक शेतकºयांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जमा झाले नाहीत. याकडे महसूल व सहकार विभागाने लक्ष द्यावे. वनजमिनीवरील अतिक्रमणाचे पट्टे देण्याचे निर्देश देवून ८ दिवसात हे प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. कार्यक्रमाचे संचालन रत्नाकर बोरकर, प्रास्ताविक मिलिंद रामटेके यांनी केले. खंडविकास अधिकारी एन.आर.जमईवार यांनी मानले.
अनुदान राशी ५ टक्के
ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, तहसील कार्यालय, महानगर पालिका, नगर पालिका, नगर पंचायती यासारख्या विविध कार्यालयांना शासनाकडून मिळणाºया निधीपैकी ३ टक्के खर्च दिव्यांगांसाठी केला जात होता. यापुढे ५ टक्के निधी दिव्यांगांच्या कल्याणासाठी खर्च केला जाणार आहे.

Web Title: Divyang is a community component

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.