गर्भवती महिलांना १३०० रूपयांचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 12:51 AM2017-07-25T00:51:40+5:302017-07-25T00:51:40+5:30

गरीब गर्भवतींना जीवनदान देणारे बाई गंगाबाई रुग्णालय सध्या विविध समस्यांनी घेरले आहे.

1300 rupees for pregnant women | गर्भवती महिलांना १३०० रूपयांचा फटका

गर्भवती महिलांना १३०० रूपयांचा फटका

Next

बीजीडब्ल्यूतील प्रकार : शस्त्रक्रियेसाठी औषधी बाहेरून आणण्याचा सल्ला
नरेश रहिले । लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गरीब गर्भवतींना जीवनदान देणारे बाई गंगाबाई रुग्णालय सध्या विविध समस्यांनी घेरले आहे. पैसे नाही म्हणून खासगी रूग्णालयात प्रसूती न करता गंगाबाईची कास धरणाऱ्या महिलांना आता प्रसूतीसाठी १३०० रूपयांची औषधी खासगी मेडीकल मधून खरेदी करावी लागत आहे. औषधी आणल्याशिवाय बाई गंगाबाईस्त्री रूग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या महिलांची शस्त्रक्रियाच होत नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
बाई गंगाबाई स्त्री रूग्णालय गोंदिया जिल्ह्यातील गरिब गर्भवती महिलांसाठी आधार देणारे केंद्र आहे. गरीबीमुळे प्रसूती खासगी रूग्णालयात करण्यास असमर्थ ठरणाऱ्या महिलांना बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात दाखल केले जाते. परंतु, या रूग्णालयात शासनाकडून औषधचा पुरवठा होत नसल्याने सीजर करणाऱ्या महिलांच्या नातेवाईकांना १२०० ते १३०० रूपयापर्यंतची औषधी बाहेरून आणण्यास भाग पाडले जाते. बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात दररोज २० सामान्य तर ८ शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती केली जाते. ज्याना कुणाचा आधार नाही. गरिबीत जीवन जगणाऱ्या महिलांना बाई गंगाबाई रुग्णालयाचा मोठा आधार आहे. परंतु, औषधे नसल्यामुळे त्यांच्यावर १३०० रूपयांचा आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे.
या संदर्भात काही नातेवाईक आरोग्य प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त करीत आहेत. परंतु ,औषधी उपलब्ध करण्याकडे आरोग्य विभागाने दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. उधार उसनवारी करून गर्भवती महिलांचे नातेवाईक बाहेरून कॅटगट नंबर १, कॅटगट नंबर २, वायक्रीन नंबर -१, एथीलॉन २-०, बीटॅडीन, एडीके ही औषधे बाहेरून आणत आहेत. तर सामान्य प्रसूतीसाठी कॅटगट नंबर १, कॅटगट नंबर २, बीटॅडीन, मिझोपॉस्ट ही औषधीही उपलब्ध नाही. त्यामुळे प्रसूतीसाठी येणाऱ्या गर्भवतींच्या नातेवाईकांमार्फत खासगी मेडीकलमधून ही औषधी आणण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे. गरीब रूग्णांच्या नातेवार्इंकांना आर्थिक भूर्दंड बसत आहे.

औषध खरेदीसाठी निधीची तरतूद करा
बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात औषध उपलब्ध नसल्यामुळे रूग्णांच्या नातेवाईकांना बाहेरून औषधे आणण्यास सांगितले जाते. परिणामी अडचणीत सापडलेल्या रूग्णांचे आर्थिक शोषण होत आहे. त्यामुळे औषधांच्या खर्चाची पूर्तत: रूग्ण कल्याण निधीतून करण्यात यावी, अशी मागणी अर्जुनी-मोरगाव विधानसभा युवक काँग्रेसचे महासचिव डॉ. विवेक मेंढे यांनी केली आहे.
सीबीसी मशीन बंदच
आठवडाभरापासून बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयाची सीबीसी मशीन बंद आहे. केटीएसची देखील सीबीसी मशीन बिघडलेली आहे. यासंदर्भात वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाताही लक्ष देत नसल्याचा आरोप होत आहे. केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या चार सीबीसी मशीन आहेत. यापैकी ती मशीन दिड वर्षापासून बंद आहेत. तर एक मशीन आता बंद झाली आहे. त्यामुळे हिमोग्लोबीन, प्लेटलेट्स व यूबीसी काऊंट करण्यासाठी रूग्णांना खासगी रूग्णालयात धाव घ्यावी लागत असल्याचे चित्र आहे.

Web Title: 1300 rupees for pregnant women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.