...तोपर्यंत वाहतूक बंद

By admin | Published: April 29, 2016 02:22 AM2016-04-29T02:22:22+5:302016-04-29T02:22:50+5:30

फोंडा : खाण खात्याने खनिज वाहतुकीत शिस्त आणण्यासाठी प्रतितास ४0 किलोमीटर एवढी वेगमर्यादा घातल्याने ट्रकमालकांना

... until the traffic is closed | ...तोपर्यंत वाहतूक बंद

...तोपर्यंत वाहतूक बंद

Next

फोंडा : खाण खात्याने खनिज वाहतुकीत शिस्त आणण्यासाठी प्रतितास ४0 किलोमीटर एवढी वेगमर्यादा घातल्याने ट्रकमालकांना दुरुस्ती व डिझेलसाठी अधिक खर्च करावा लागणार आहे. सरकारचा निर्णय ट्रकमालकांना मान्य नसून ट्रकमालक त्याचा निषेध करीत आहेत. जोपर्यंत सरकार अ. गो. ट्रकमालक संघटनेकडे यासंदर्भात विचारविनिमय करीत नाही, तोपर्यंत कोडली ते आमोणा मार्गावरील खनिज वाहतूक शुक्रवारपासून बंद ठेवण्याचा निर्णय संघटनेच्या सभेत घेण्यात आला. ही सभा गुरुवारी वडाकडे-उसगाव येथे झाली.
या सभेला संघटनेचे अध्यक्ष नीळकंठ गावस, शिवदास माडकर, शिवाजी नाईक, मंगलदास नाईक, बालाजी गावस व अन्य ट्रकमालक उपस्थित होते. प्रतितास ४0 किलोमीटर वेगाने वाहतूक करताना डिझेल अधिक लागते. तसेच ट्रकांचा दुरुस्ती खर्चही वाढतो. सरकारने यासंदर्भात ट्रकमालकांना विश्वासात घेऊन वेगमर्यादेविषयी चर्चा करण्याची गरज होती; परंतु तसे न करता खाण खात्याने वेगमर्यादा लागू केल्याने अनेक ट्रकांवर कारवाई करण्यात आली. हा निर्णय म्हणजे एकप्रकारे सरकारची हुकूमशाहीच असून ट्रकमालक संघटित नसल्यामुळे सरकार खाण कंपन्यांचे हित जपत आहे. प्रतितास ४0 किलोमीटर वेगाने ट्रक चालवून नुकसान सोसण्यापेक्षा ट्रक बंद ठेवणे ट्रकमालकांसाठी अधिक सोयीस्कर ठरेल, असेही नीळकंठ गावस पुढे म्हणाले.
अ. गो. ट्रकमालक संघटनेतर्फे काही महिन्यांपूर्वी वाहतूक दरवाढीसाठी सुमारे चार महिने आंदोलन करण्यात आले होते. मात्र, सरकारची भूमिका पाहता आता वेगमर्यादेमुळे ट्रकमालकांवर ट्रक बंद ठेवण्याची वेळ आल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, खाणबंदीच्या काळात खाणी सुरू व्हाव्यात म्हणून खाण कंपन्यांचे अधिकारी ट्रकमालकांना भडकावून आंदोलने करण्यास भाग पाडीत होते. आता सरकारने वेगमर्यादा लागू केल्यामुळे हेच खाण कंपनीचे अधिकारी पुन्हा ट्रकमालकांना रस्त्यावर उतरण्यास चिथवत असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. यामुळे एनकेन प्रकारे ट्रकमालकांनाच याचा फटका बसणार. जोपर्यंत सरकार वेगमर्यादेसंबंधी संघटनेशी चर्चा करीत नाही, तोपर्यंत खनिज वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय ट्रकमालक संघटनेने घेतला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: ... until the traffic is closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.