ग्रेट इंडियन ट्रॅव्हल बझारमध्ये सहभागी होणार पर्यटन खाते

By समीर नाईक | Published: May 3, 2024 04:31 PM2024-05-03T16:31:17+5:302024-05-03T16:32:59+5:30

गोवा या व्यासपीठाचा लाभ घेऊन आपल्या अनोख्या पर्यटन प्रस्तावाचे प्रदर्शन करेल आणि जगभरातील पर्यटकांना आकर्षित करेल.

Tourism accounts to participate in the Great Indian Travel Bazaar | ग्रेट इंडियन ट्रॅव्हल बझारमध्ये सहभागी होणार पर्यटन खाते

ग्रेट इंडियन ट्रॅव्हल बझारमध्ये सहभागी होणार पर्यटन खाते

पणजी : जयपूर, राजस्थान येथे दि. ५ ते ७ मे २०२४ या कालावधीत होणाऱ्या प्रतिष्ठित ग्रेट इंडियन ट्रॅव्हल बझारच्या (जीआयटीबी) १३ व्या पर्वात पर्यटन खाते सहभागी होणार आहे, अशी माहिती पर्यटन खात्यातर्फे देण्यात आली आहे.

गोवा या व्यासपीठाचा लाभ घेऊन आपल्या अनोख्या पर्यटन प्रस्तावाचे प्रदर्शन करेल आणि जगभरातील पर्यटकांना आकर्षित करेल.  जीआयटीबी मधील गोवा पर्यटनाचे दालन पुनर्संचयित पर्यटन दृष्टिकोनांतर्गत शाश्वत उपक्रम दर्शवेल, ज्यामध्ये राज्यातील अज्ञात प्रदेशाचा शोध, नैसर्गिक आणि सांस्कृतिक वास्तूचे जीर्णोद्धार आणि पुनर्संचयित आणि आध्यात्मिक पर्यटनाच्या दिशेने प्रवास यासारख्या मुद्यांवर लक्ष केंद्रित केले जाईल. 

अभ्यागतांना ११ मंदिरांचा समावेश असलेल्या एकादश तीर्थ सर्किटचे दर्शन घेण्याची आणि २१ नोव्हेंबर २०२४ पासून ५ जानेवारी २०२५ पर्यंत बॅसिलिका ऑफ बॉम जीझस येथे सेंट फ्रान्सिस झेवियरच्या प्रदर्शनाचे साक्षीदार होण्याची संधी मिळेल.

गोवा पर्यटन विभागाचे सचिव संजीव आहुजा यांनी सांगितले की, जीआयटीबी गोव्याला उद्योग भागधारकांशी संलग्न होण्यासाठी, भागीदारी तयार करण्यासाठी आणि आमच्या गंतव्यस्थानाची व्यक्तिरेखा उंचावण्यासाठी एक अतुलनीय व्यासपीठ प्रदान करणार आहे. आम्ही या कार्यक्रमात आमचे नाविन्यपूर्ण उपक्रम आणि सहयोगी प्रयत्न सादर करणार आहोत.  आमच्या दालनामध्ये अभ्यागतांचे स्वागत करण्यासाठी आणि गोव्याचे सौंदर्य, आदरातिथ्य जगासोबत शेअर करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.

गोवा एक प्रमुख वेडिंग डेस्टिनेशन म्हणून उदयास आले आहे. द वेड इन इंडिया एक्स्पोमध्ये गोव्याचे आकर्षण दाखवण्याची एक उत्तम संधी लाभलेली आहे. यावरही जास्त भर देण्यात येणार आहे, असेही आहुजा यांनी सांगितले.

Web Title: Tourism accounts to participate in the Great Indian Travel Bazaar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा