जेकबकडून हजारो कोटींचे खनिज निर्यात, एसअायटीकडून वागुस -पाळी खाणीचे सर्व्हेक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2017 08:18 PM2017-11-28T20:18:56+5:302017-11-28T20:19:10+5:30

फिलीप जेकबने हजारो कोटी रुपये किंमतीचा खनिज माल वागुस - पाळी येथील खाणींवरून उचलल्याचा विशेष तपास पथकाचा (एसअायटी) दावा असून सोमवारी एसआयटीने खाण अधिका-यांसह या खनिज डंपची पाहणी केली. 

Thousands of crores of mineral exports from Jacob, Wagus-Wali mine survey by the Society | जेकबकडून हजारो कोटींचे खनिज निर्यात, एसअायटीकडून वागुस -पाळी खाणीचे सर्व्हेक्षण

जेकबकडून हजारो कोटींचे खनिज निर्यात, एसअायटीकडून वागुस -पाळी खाणीचे सर्व्हेक्षण

Next

पणजी: फिलीप जेकबने हजारो कोटी रुपये किंमतीचा खनिज माल वागुस - पाळी येथील खाणींवरून उचलल्याचा विशेष तपास पथकाचा (एसअायटी) दावा असून सोमवारी एसआयटीने खाण अधिका-यांसह या खनिज डंपची पाहणी केली. 
केरळ येथील फिलीप जेकब या खनिज ट्रेडरने कोट्यवधी रुपयांचा खनिज माल बेकायदेशीरपणे निर्यात केल्याचे आढळून आल्यामुळे त्याला केरळ येथे जाऊन एसआयटीने अटक केली होती. गोव्यातील खाण मालकांशी त्याचे आसलेले संबंध आणि त्यांच्याशी झालेले व्यवहारही उघडकीस आणले होते. त्याने वागुस पाळये येथील खाणीवरील खनीज डंप मोठ्या प्रमाणावर उचलून निर्यात केली होती. त्यामुळे खाण खात्यातील काही अधिका-यांना घेऊन एसआयटीने या खाणीचे सव्हेक्षण केले.  सुमारे ६० हजार मेट्रीक टन खनिज डंप तेथून उचलण्यात आल्याची माहिती एसआयटीचे अधीक्षक कार्तिक कश्यप यांनी दिली. 
२००६ ते २०१२ या काळात हे बेकायदेशीर व्यवहार मोठ्या प्रमाणात करण्यात आले होते. फिलीप जेकबने गोव्यातील खाण मालकांशी ४०० कोटी रुपयांचे व्यवहार केले असल्याची बँक ट्रान्जेक्शन ही एसआयटीला मिळाली आहेत. आरटीजीएसद्वारे कोट्यवधी रुपयांचे हस्तांतरण करण्यात आले होते असेही उघडकीस आले आहे. निरीक्षक दत्तगुरू सावंत, एसआयटीचे सदस्य नवीन पालयेकर, किरण परब, कल्पेश शिरोडकर, खाण खात्याचे सहाय्यक भूगर्भतज्ज्ञ सुधीर मांद्रेकर आणि वसंत कारेलियन हेही पथकासमवेत होते.

Web Title: Thousands of crores of mineral exports from Jacob, Wagus-Wali mine survey by the Society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा