वाढत्या उष्णतेमुळे आग लागण्याचा घटनांत वाढ : प्रतिदिन अग्निशमन दलाकडे येतात १५ ते २५ तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2024 03:26 PM2024-03-27T15:26:23+5:302024-03-27T15:26:46+5:30

गेल्या वर्षी याच दिवसांत डाेंगराळ भागात आग्नी तांडव झाला होता. सत्तरीतील तसेच इतर भागातील अनेक डाेगरांवर आग लागण्याचा घटना या दिवसात घडत आहेत.

Increase in fire incidents due to rising heat:15 to 25 complaints are received by the fire brigade every day | वाढत्या उष्णतेमुळे आग लागण्याचा घटनांत वाढ : प्रतिदिन अग्निशमन दलाकडे येतात १५ ते २५ तक्रारी

वाढत्या उष्णतेमुळे आग लागण्याचा घटनांत वाढ : प्रतिदिन अग्निशमन दलाकडे येतात १५ ते २५ तक्रारी

नारायण गावस

पणजी : राज्यात मागील आठवड्यापासून प्रचंड उष्णता वाढत असून आग लागण्याचा घटनाही वाढत आहेत. अग्निशमन दलाकडे  प्रतिदिन १५ ते २५ आग लागण्याचा तक्रारी येत आहेत.  यात बहुतांश तक्रारी या माळरान तसेच काजू बागायतीला लागण्याचा घटना आहेत. सध्या उष्णता एवढी वाढली आहे की मिळेल तिथे आग लागण्याच्या घटना घडत आहेत.

गेल्या वर्षी याच दिवसांत डाेंगराळ भागात आग्नी तांडव झाला होता. सत्तरीतील तसेच इतर भागातील अनेक डाेगरांवर आग लागण्याचा घटना या दिवसात घडत आहेत. अजूनही अशा घटना घडत आहे. बहुतांश आग ही काजू बागायतीमध्ये लागतात. लाेक सिगरेट ओढून ती न विझवता फेकून देतात यातून सुक्या गवताला पेट धरला जातो नंतर तसेच काजू बागायतीमध्ये जाते. तसेच लोक बागायती साफ करण्यासाठी आग लावतात ती आग नंतर त्यांना आटोक्याबाहेर गेल्यावर आग रौद्ररुप धारण करुन बागायत नष्ट करते. आतापर्यंत अनेक अशा तक्रारी अग्निशमन दलाकडे आल्या आहेत. 

तसेच या दिवसात उष्णता वाढत असल्याने गोदामांना तसेच दुकानांना त्याचप्रमाणे घारातील गॅस सिलिडर फुटण्याचा घटनाही घडत आहे. अनेक ठिकाणी असे प्रकार घटन असू् अग्निशमन दलाच्या जवानांना ही आग आटोक्यात आणताना अनेक कष्ट घ्यावे लागत आहेत.  यंदा सत्तरी, पेडणे, डिचाेली तसेच इतर विविध भागात काजू बागायतींना आग लागण्याच्या  घटना  घडल्या आहेत.  तसेच घरांनाही आग लागण्याच्या घटना घडत आहेत.

राज्यात बहुतांश माळरानात तसेच काजू बागायतीला आग लागण्याच्या घटना या जानेवारी ते मे पर्यंत  घडत असतात. आता सध्या उष्णता वाढली असल्याने लोकांनी अशी उघड्यावर आग लावणे टाळावे. माळरानात  लागले आग आटोक्यात आणताना मोठा त्रास होताे.  अग्नीशमन दलाची गाडी पोहचू शकत नसल्याने हाताने पाणी घेऊन आग विझवावी लागते असे अग्नीशमन दलाचे अधिकारी निलेश यांनी सांगितले.

Web Title: Increase in fire incidents due to rising heat:15 to 25 complaints are received by the fire brigade every day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग