गोवा कर्नाटकला वरचढ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 02:19 AM2017-07-20T02:19:08+5:302017-07-20T02:22:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्कडिचोली : तब्बल २६ दिवस कर्नाटकच्या साक्षीदाराची उलटतपासणी करताना गोव्याच्या टीमने लवादासमोर म्हादई प्रश्नी कर्नाटकला

Goa tops Karnal! | गोवा कर्नाटकला वरचढ!

गोवा कर्नाटकला वरचढ!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
डिचोली : तब्बल २६ दिवस कर्नाटकच्या साक्षीदाराची उलटतपासणी करताना गोव्याच्या टीमने लवादासमोर म्हादई प्रश्नी कर्नाटकला सपशेल उघडे पाडले. साक्षीदार डॉ. ए.एस. गोसाईन यांना विविध मुद्द्यांवर घेरण्यात गोव्याला यश आले. बुधवारपासून दुसरे साक्षीदार ए. के. बजाज यांची उलटतपासणी गोव्याने सुरू केली असून त्यांना घेरण्यासाठी जय्यत तयारी केल्याचे दिल्लीतून सांगण्यात आले.
गोसाईन यांनी २६ दिवसांच्या लवादासमोरील उलटतपासणीत अनेक बाबतींत चुकीची आकडेवारी, खोटी माहिती, केंद्रीय जल आयोगाचा अहवाल, पाण्याची उपलब्धता, २०१५, २०१६, २०१७ चा अहवाल याबाबत तिन्ही वर्षांची दिलेली माहिती व आकडेवारी विपर्यास करणारी असल्याने या उलटतपासणीत कर्नाटकला मोठा धक्का बसलेला आहे. लवादाने या खोट्या माहितीची गंभीर दखल घेतली आहे.
बुधवारपासून नवीन साक्षीदार ए.के. बजाज यांची साक्ष सुरू झालेली असून त्यांनाही घेरण्यासाठी गोव्याने शिस्तबद्ध रणनीती आखल्याचे सांगण्यात आले.
आत्माराम नाडकर्णी, दत्तप्रसाद लवंदे, प्रताप वेणुगोपाल, पंकज पै वेर्णेकर, साल्वादोर रिबेलो, अमोघ प्रभुदेसाई, चेतन पंडित, प्रेमानंद कामत, एस. पाटील, गोपिनाथ देसाई, सुरेश आदींनी गोव्याची बाजू अधिकच प्रभावीपणे संघटितपणे लावून धरताना कर्नाटकच्या साक्षीदाराला सपशेल उघडे पाडले असून त्यामुळे कर्नाटकलाही फटकार बसली आहे. लवादाच्या त्रिसदस्यीय टीमने देखील गोव्याच्या भूमिकेनंतर कर्नाटकाला वारंवार फैलावर घेत त्यांच्या चुका निदर्शनास आणून दिल्याने सध्या गोव्याची बाजू अधिकच भक्कम होताना दिसत आहे. दरम्यान, कर्नाटकच्या अरेरावीमुळे कणकुंबी येथे कळसा कालव्याच्या कामाच्या ठिकाणी भयानक स्थिती असून रस्ते वाहून गेले. कालवे खचल्याने व कालव्यात वाहन कोसळल्याने स्थिती दयनीय झाली आहे.

Web Title: Goa tops Karnal!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.