निवडणुकांसाठी मतदार याद्या ‘अपडेट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2022 10:01 PM2022-11-11T22:01:21+5:302022-11-11T22:02:07+5:30

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. एकत्रिकृत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा कालावधी ९ नोव्हेंबर २०२२ (बुधवार) रोजीपर्यंत असेल. दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी दिनांक ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर, विशेष मोहिमांचा कालावधी हा दावे व हरकती स्वीकारण्याच्या कालावधीत मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी निश्चित केल्यानुसार दिनांक १९ व २० नोव्हेंबर २०२२ तसेच ३ व ४ डिसेंबर २०२२ रोजी राहणार आहे.

Voter lists 'updated' for elections | निवडणुकांसाठी मतदार याद्या ‘अपडेट’

निवडणुकांसाठी मतदार याद्या ‘अपडेट’

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांसोबत इतर निवडणुकांसाठी मतदार याद्यांचे अद्यावतीकरण केले जाणार आहे. त्यामुळे नवमतदारांनाही आगामी निवडणुकांमध्ये मतदार करण्याची संधी मिळणार आहे. दि. १ जानेवारी, २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रांसह मतदार याद्यांमध्ये नव्याने मतदारांचा समावेश केला जाणार आहे.
विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. एकत्रिकृत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा कालावधी ९ नोव्हेंबर २०२२ (बुधवार) रोजीपर्यंत असेल. दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी दिनांक ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर, विशेष मोहिमांचा कालावधी हा दावे व हरकती स्वीकारण्याच्या कालावधीत मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी निश्चित केल्यानुसार दिनांक १९ व २० नोव्हेंबर २०२२ तसेच ३ व ४ डिसेंबर २०२२ रोजी राहणार आहे. दावे, हरकती दि. २६ डिसेंबरपर्यंत निकालात काढून मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी दि. ५ जानेवारी, २०२३ रोजी केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी मिणा यांनी पत्रपरिषदेत सांगितले.

प्रारूप यादी प्रकाशित, मतदारांनो माहिती तपासा 
दिनांक ९ नोव्हेंबर २०२२ रोजी जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय तसेच सर्व मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये प्रारूप मतदार यादी प्रकाशित केलेली आहे. मतदारांनी आपले नाव, पत्ता, लिंग, जन्मदिनांक, वय, ओळखपत्र क्रमांक, मतदार संघ इ. तपशील मतदार यादीत तपासून ते अचूक आहेत का याची खात्री करणे आवश्यक आहे. 
बरेचदा ऐन मतदानाच्या दिवशी आपले नाव मतदार यादीत नाही, अशी तक्रार अनेक मतदारांकडून केली जाते. त्यामुळे मतदारांनी प्रारूप मतदार यादीतील आपले तपशील आत्ताच तपासणे महत्त्वाचे आहे. दि. ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०२२ हा कालावधी मतदार नोंदणीचा आहे, तसा तो एखाद्याच्या नावासंबंधी हरकती घेण्याचाही आहे. एखाद्या मतदारसंघातील एखादा मतदार, यादीत दिलेल्या पत्त्यावर राहत नसेल, तर अशा नावाबद्दल त्याच मतदारसंघातील अन्य मतदार आक्षेप घेऊ शकतो. 
मतदार नोंदणीसाठी पात्र युवांनी मतदार यादीत आपले नाव नोंदवावे तसेच प्रत्येक मतदारांनी प्रारूप मतदार यादीतील आपले तपशील अचूक आहेत का याची खात्री करून घ्यावी, शिवाय मतदार नोंदणी, नाव वगळणी, तपशिलातील दुरुस्त्या संकेतस्थळावर आणि मोबाइल ॲपवर उपलब्ध आहेत, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय मीणा यांनी सांगितले.    

 चार टप्प्यांत करता येणार मतदार नोंदणी 
आतापर्यंत मतदार नोंदणीसाठी दि. १ जानेवारी हा अर्हता दिनांक असायचा. म्हणजे दि. १ जानेवारी किंवा त्याआधी १८ वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांना मतदार नोंदणी करता यायची. मात्र २०२३ पासून भारत निवडणूक आयोगाने आता चार अर्हता दिनांक, अनुक्रमे १ जानेवारी, १ एप्रिल, १ जुलै व १ ऑक्टोबर किंवा त्या आधी ज्या नागरिकांची १८ वर्षे पूर्ण होतील, त्यांना दि. ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०२२ या विशेष मोहिमेंतर्गत आगाऊ मतदार नोंदणी करता येणार आहे.

 

Web Title: Voter lists 'updated' for elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.