रस्त्याच्या बाजूला पुन्हा दुचाकी वाहनांची पार्किंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 11:50 PM2019-07-07T23:50:42+5:302019-07-07T23:53:01+5:30

गडचिरोली शहरातील आठवडी बाजारात रस्त्याच्या बाजुला पुन्हा वाहनांची पार्र्किंग सुरू झाली आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असून सदर वाहनधारकांवर कारवाई करण्याची गरज आहे. गडचिरोली शहरातील आठवडी बाजार मूल मुख्य मार्गावर अगदी रस्त्याच्या बाजुला भरतो.

Two-wheeler parking on the side of the road | रस्त्याच्या बाजूला पुन्हा दुचाकी वाहनांची पार्किंग

रस्त्याच्या बाजूला पुन्हा दुचाकी वाहनांची पार्किंग

googlenewsNext
ठळक मुद्देआठवडी बाजारात वाहतुकीची कोंडी : बहुतांश नागरिक नेमून दिलेल्या स्थळी उभी करतात वाहने

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली शहरातील आठवडी बाजारात रस्त्याच्या बाजुला पुन्हा वाहनांची पार्र्किंग सुरू झाली आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असून सदर वाहनधारकांवर कारवाई करण्याची गरज आहे.
गडचिरोली शहरातील आठवडी बाजार मूल मुख्य मार्गावर अगदी रस्त्याच्या बाजुला भरतो. एक वर्षापूर्वी दुचाकी वाहने रस्त्याच्या दुतर्फा उभी केली जात असल्याने वाहतुकीची कोंडी होत होती. दोन मोठमोठी वाहने समोर आल्यानंतर वाहतुकीची कोंडी आणखीच वाढत होती. वाहतूक पोलिसांनी पुढाकार घेत मच्छिमार्केटजवळ असलेली जागा आठवडी बाजारात येणाऱ्या वाहनधारकांच्या वाहनांच्या पार्र्किंगसाठी उपलब्ध करून दिली. आठवडी बाजारात तीन ते चार वाहतूक पोलीस उभे राहत होते. तसेच ज्या बाजुला यापूर्वी पार्र्किंग केली जात होती, त्या ठिकाणी दोरी बांधून पार्र्किंग होणार नाही, याची खबरदारी घेतली. तसेच तलावाच्या बाजुला असलेल्या पार्र्किंगमध्येच वाहने उभी करण्यासाठी वाहतूक पोलीस मार्गदर्शन करत होते. याचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. अजुनही काही सुज्ञ नागरिक पार्र्किंगच्या जागेवर वाहने उभे करतात. मात्र कायद्याची व अपघाताच्या परिणामांची जाण नसलेले नागरिक रस्त्याच्या बाजुला वाहने पार्र्किंग करून ठेवतात. त्यामुळे वाहतुकीच्या कोंडीची समस्या वाढली आहे. वाहन चालान करणे हा वाहनधारकाला वाहतूक नियमांची जाणीव करून देण्याचा प्रयत्न वाहतूक पोलिसांचा राहतो. मात्र वाहतूक पोलिसांसोबतच काही नागरिक बाचाबाची करतात. त्यामुळे कारवाई करण्यास अडचण येत आहे.

अंमलबजावणी होणार
पुढच्या रविवारपासून पार्र्किंगची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. जे वाहनधारक रस्त्यावर वाहने ठेवतील, त्यांचे वाहन चालान केले जाणार आहे. पोलिसांसोबत हुज्जत घालणाऱ्यांविरोधात पोलीस कारवाई करण्याचा इशारा सुध्दा वाहतूक पोलिसांनी दिला आहे. नागरिकांना यामाध्यमातून कायद्याची जाण करून देण्याचा प्रयत्न होणार आहे.

Web Title: Two-wheeler parking on the side of the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.