कचराकुंडीमुक्त शहर करण्यासाठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 12:41 AM2018-07-29T00:41:06+5:302018-07-29T00:42:02+5:30

घंटागाडीच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक घरातील कचºयाची उचल करून शहर कचराकुंडीमुक्त करण्याचा निर्धार आहे. त्यासाठी नियोजन करण्यात आले असून केंद्र शासनाने साहित्य खरेदी व मनुष्यबळाचे वेतन देण्यासाठी गडचिरोली नगर परिषदेला पुन्हा १ कोटी ८३ लाख रूपयांचा निधी देणार आहे.

Trying to be a trash-free city | कचराकुंडीमुक्त शहर करण्यासाठी प्रयत्न

कचराकुंडीमुक्त शहर करण्यासाठी प्रयत्न

Next
ठळक मुद्देसाधने वाढणार : प्रत्येक घरातून कचऱ्याची उचल करण्याचे नियोजन
<p>दिगांबर जवादे।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : घंटागाडीच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक घरातील कचऱ्याची उचल करून शहर कचराकुंडीमुक्त करण्याचा निर्धार आहे. त्यासाठी नियोजन करण्यात आले असून केंद्र शासनाने साहित्य खरेदी व मनुष्यबळाचे वेतन देण्यासाठी गडचिरोली नगर परिषदेला पुन्हा १ कोटी ८३ लाख रूपयांचा निधी देणार आहे.
पुढील दोन वर्षांत स्वच्छ भारत निर्माण करायचा आहे. त्यादृष्टीने केंद्र शासन टप्प्याटप्प्याने उपक्रम राबवित असून त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश प्रशासकीय यंत्रणेला देत आहे. सुरूवातीला हागणदारीमुक्त शहर करण्यावर भर देण्यात आला. त्यानंतर आता प्रत्येक शहर स्वच्छ होईल यावर विशेष लक्ष दिला जात आहे. गडचिरोली शहरात घंटागाड्यांच्या माध्यमातून कचऱ्याची उचल केली जाते. मात्र घंटागाड्यांच्या माध्यमातून उचल केलेला कचरा जवळपासच्या कचराकुंडीमध्ये टाकला जातो. कधीकधी कचराकुंडी कचऱ्याने पूर्णपणे भरून कचरा बाजुला पडून राहतो. त्यामुळे कचराकुंडीमुळेच अस्वच्छता निर्माण होते. घंटागाडीत जमा झालेला कचरा डम्पिंग यार्डवर नेऊन टाकणे शक्य होत नाही. परिणामी घंटागाडी चालक जवळपासच्या कचराकुंडीमध्ये कचरा टाकतात. यावर उपाय म्हणून एक टन क्षमतेच्या पाच गारबेज ट्रिपर वाहने खरेदी केली जाणार आहेत. सदर वाहनात घंटागाडीतील कचरा टाकला जाईल. त्यानंतर तो कचरा वाहनाद्वारे डम्पिंग यार्डमध्ये टाकला जाईल. प्रत्येक घरातील कचऱ्याची उचल व्हावी यासाठी पुन्हा १९ घंटागाड्या खरेदी केल्या जाणार आहेत. दर दिवशी रस्ते साफ केले जातील. प्रत्येक सफाई कामगाराला ७५० मीटर रस्ता झाडण्याचे उद्दिष्ट दिले जाईल. त्याच्या मागे ढक्कलगाडी राहिल. शहरातील रस्त्यांची लांबी लक्षात घेतली तर ७० सफाई कामगार लागतील. सध्या नगर परिषदेकडे २९ कामगार कार्यरत आहेत. त्यात आता पुन्हा ७० कामगारांची भर पडणार आहे. बाजारपेठेतील कचऱ्याची उचल करण्यासाठी दोन टन वजन वाहून नेण्याची क्षमता असलेले चार वाहने खरेदी केली जाणार आहेत. दररोज किती कचरा जमा होतो, याचे मोजमाप करण्यासाठी वेट ब्रिज सुध्दा खरेदी केला जाणार आहे.
ओला व सुका कचºयाबाबत जनजागृती गरजेची
ओल्या कचºयामध्ये विशेष करून भाजीपाला व इतर विघटनशील पदार्थांचा समावेश होतो. तर सुक्या कचऱ्यामध्ये प्लास्टिक, काच आदींचा समावेश होतो. कचऱ्याचे विघटन करताना ओला व सुका कचरा वेगळा करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया अत्यंत किचकट, वेळखाऊ आहे. नागरिकांनी स्वत:च ओला व सुका कचरा वेगळा करून तो कचराकुंडीच्या ओला व सुका म्हणून लिहिलेल्या टप्प्यात टाकल्यास बराच खर्च वाचण्यास मदत होते. शहरातील कचराकुंड्यांना ओला व सुका कचऱ्यासाठी दोन कप्पे दिले आहेत. मात्र त्याप्रमाणे कचरा टाकला जात नाही. यासाठी नगर परिषदेने नागरिकांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे.

Web Title: Trying to be a trash-free city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.