Three injured in Randukar attack | रानडुकराच्या हल्ल्यात तिघे जखमी

ठळक मुद्देघोट येथील घटना : महिलेचा समावेश

आॅनलाईन लोकमत
घोट : रानडुकराच्या हल्ल्यात तिघे जखमी झाल्याची घटना गुरूवारी ८ वाजताच्या सुमारास घोट येथे घडली.
गणपती नारायण दुधबावरे यांच्या मंजेगाव मार्गावर असलेल्या शेतातील विहिरीमध्ये रानडुकर पडून असल्याची माहिती दीपक दुधबावरे यांनी घोट वन परिक्षेत्राधिकारी शेखर तनपुरे यांना दिली. ते आपल्या कर्मचाºयांसह डुकराला विहिरीबाहेर काढण्यासाठी गेले. डुकराला विहिरीतून बाहेर काढल्यानंतर तो सैरावैरा पळत सुटला. दरम्यान हरीभाऊ गणपती नेवारे (७०) रा. घोट हे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मार्गाने घराकडे परत येत असताना रानडुकराने हल्ला केला. यात ते जखमी झाले. त्यानंतर पत्रू गणपती कोठारे (६०) यांनाही जखमी केले. त्यांच्या पायाला मार लागला. संगीता विलास पिपरे (३५) ही अंगणात सळा टाकत असताना त्यांनाही धडक दिली. त्या खाली कोसळल्या. त्यानंतर एका बैलाला सुध्दा धडक दिली. वन परिक्षेत्राधिकारी शेखर तनपुरे, क्षेत्र सहायक गंजेवार, वनरक्षक धानोरकर, भांडेकर यांनी जखमीची भेट घेतली. जखमींना प्रथोमोपचारासाठी घोट प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.