पाण्याअभावी धानपीक करपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 01:32 AM2018-10-11T01:32:51+5:302018-10-11T01:34:28+5:30

चामोर्शी तालुक्यातील तळोधी मो. व परिसरातील धान पीक पावसाअभावी करपले आहे. शेवटच्या टप्प्यात असलेले धान पीक वाचविण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. परंतु पाण्याचे स्त्रोत आटण्याच्या स्थितीत असल्याने धान पीक पूर्णत: नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.

There is no rain water for the rainy season | पाण्याअभावी धानपीक करपले

पाण्याअभावी धानपीक करपले

Next
ठळक मुद्देतळोधी मोकासा परिसर : सर्वेक्षण करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
तळोधी (मोकासा) : चामोर्शी तालुक्यातील तळोधी मो. व परिसरातील धान पीक पावसाअभावी करपले आहे. शेवटच्या टप्प्यात असलेले धान पीक वाचविण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. परंतु पाण्याचे स्त्रोत आटण्याच्या स्थितीत असल्याने धान पीक पूर्णत: नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे या भागातील पिकांचे सर्वेक्षण करून तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
यंदाच्या खरीप हंगामात सुरूवातीला समाधानकारक पाऊस झाला. परंतु मागील महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने निसव्याच्या स्थितीत असलेल्या धान पिकाला फटका बसला. पीक वाचविण्यासाठी शेतकºयांना तलाव, बोडी, शेततळे व सिंचन विहिरींचा आधार घ्यावा लागत आहे. पैसे देऊन शेतीला पाणी करावे लागत आहे. मध्यम व जड प्रतिच्या धानाला एका पाण्याची आवश्यकता असतानाच पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना पाण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. तळोधी व परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांचे धान पीक पाण्याअभावी करपले आहे. त्यामुळे या कुुटुंबांना आर्थिक व उदरनिर्वाहाच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. पीक हाती येण्याआधीच पावसाअभावी करपल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे.
रानटी डुकरांचा हैदोस
तळोधी व परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांचे शेत जंगलाला लागून आहे. त्यामुळे या शेतातील पिकाची रानडुकरांकडून अनेकदा नासाडी केली जात आहे. गावातील काही शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे वन विभागाकडून करण्यात आले. परंतु मागील दोन वर्षांपासून महसूल विभागाकडून धान पिकाच्या नुकसानीची भरपाई मिळालेली नाही.

Web Title: There is no rain water for the rainy season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.