गडचिरोलीत दारू विक्रेत्यांविरूद्ध महिलांची धडाकेबाज कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 03:02 PM2019-03-13T15:02:30+5:302019-03-13T15:06:07+5:30

कोरेगाव येथील मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांनी मंगळवारी दारूविक्रेत्यांविरोधात धडाकेबाज कारवाई करीत ५० लिटर दारू, ४ चुंगड्या मोहसडवा, सडवा भरून ठेवण्यासाठी आणलेले ४० रिकामे ड्रम आणि इतरही साहित्य जप्त केले.

Strong action against liquor sellers by women in Gadchiroli | गडचिरोलीत दारू विक्रेत्यांविरूद्ध महिलांची धडाकेबाज कारवाई

गडचिरोलीत दारू विक्रेत्यांविरूद्ध महिलांची धडाकेबाज कारवाई

Next
ठळक मुद्देदारूसाठा, मोहसडवा व साहित्य जप्तकागदपत्रे रोखून ग्रामपंचायत करणार विक्र ेत्यांची कोंडी

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : तालुक्यातील कोरेगाव येथील मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांनी मंगळवारी दारूविक्रेत्यांविरोधात धडाकेबाज कारवाई करीत ५० लिटर दारू, ४ चुंगड्या मोहसडवा, सडवा भरून ठेवण्यासाठी आणलेले ४० रिकामे ड्रम आणि इतरही साहित्य जप्त केले.
आरमोरी तालुक्यापासून ३२ किमी अंतरावर असलेल्या कोरेगाव येथे मोठ्या प्रमाणात मोहफुलाची दारू गाळली जाते. त्यामुळे महिलावर्ग त्रस्त आहे. अनेक वेळा प्रयत्न करूनही विक्रेते जुमानत नाही. त्यामुळे हे गाव इतरही गावांसाठी डोकेदुखी ठरले आहे. मुक्तिपथ अभियानाच्या तालुका टीमने येथे बैठक घेऊन आधी महिलांना संघटीत केले. महिला स्वबळावर दारूविक्री बंद करू शकत असल्याचा विश्वास दिला. त्यामुळे गेल्या आठवड्यात येथे गाव संघटन तयार करून महिलांनीच दारूच्या प्रश्नावर विशेष ग्रामसभा बोलविली. या ग्रामसभेत गावात दारूविक्री बंदीचा ठराव घेण्यात आला. सोबतच २८ दारू विक्रेत्यांची यादी तयार करून त्यांना विक्री बंद करण्याबाबत नोटीस देण्यात आली. या प्रक्रियेनंतरही गावात दारूविक्री सुरूच होती. त्यामुळे दि. १२ रोजी मुक्तिपथ तालुका चमुद्वारे गाव संघटनेला कारवाई करण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यानंतर महिलांनी गावातील महिला व सूज्ञ लोकांना एकत्रित करून दारू विक्रेत्यांच्या घरी धाड टाकली. एवढेच नाही तर विक्रेत्यांचे जंगलातील अड्डे शोधून काढत दारू, मोहसडवा आणि ड्रम जप्त केले. गावातील काही पुरु षही या कारवाईत सहभागी झाले होते. त्यांनी जप्त केलेली दारू रस्त्यावर ओतून नष्ट केली. मिळालेले साहित्य डोक्यावर उचलून महिलांनी ते चौकात आणले. या अहिंसक कारवाईत कोरेगावच्या सरपंच जिजा उसेंडी, माजी सरपंच बालाजी गेडाम, पोलीस पाटील ओमप्रकाश मडावी, गावसंघनेच्या अध्यक्ष सुनीता मडावी, सचिव सुलोचना राऊत यांच्यासह ४० ते ४५ महिला आणि पुरु ष सहभागी झाले होते.

दाखले व रेशनपासून ठेवणार वंचित
दारूविक्री बंद होण्यासाठी ग्रामपंचायतने कठोर पाऊल उचलत दारूविक्री करीत असलेल्यांना यापुढे रेशनकार्डवर धान्य न देण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला आहे. त्यासोबतच आवश्यक दाखले आणि कागदपत्रांपासून त्यांना मुकावे लागणार आहे.
ग्रामसभेत दारूविक्रेत्यांची यादी जाहीर करण्यात आली होती. नोटीस देऊनही दारूविक्री सुरूच ठेवल्याने विक्रेत्यांना रोजगार हमी योजनेच्या कामावरूनही कमी करण्यात आले आहे. त्यांची यादी रोजगार सेवकांना देऊन मस्टरवरून त्यांची नावे वगळण्यात आली आहेत.

Web Title: Strong action against liquor sellers by women in Gadchiroli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.