रेल्वे स्टेशनच्या समस्यांचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 12:55 AM2018-07-12T00:55:01+5:302018-07-12T00:56:09+5:30

दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूरच्या प्रबंधक बंदोपाध्याय यांनी देसाईगंज रेल्वे स्टेशनला बुधवारी भेट देऊन येथील अनेक समस्या जाणून घेतल्या. याप्रसंगी देसाईगंजातील व्यापारी व नागरिकांनी त्यांना विविध समस्यांचे निवेदन सादर करून त्या सोडविण्याची मागणी केली.

Review of the problems of the railway station | रेल्वे स्टेशनच्या समस्यांचा आढावा

रेल्वे स्टेशनच्या समस्यांचा आढावा

Next
ठळक मुद्देपाठपुरावा करण्याचे आश्वासन : नागपूर मंडळ रेल्वे प्रबंधकांची देसाईगंजला भेट

लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूरच्या प्रबंधक बंदोपाध्याय यांनी देसाईगंज रेल्वे स्टेशनला बुधवारी भेट देऊन येथील अनेक समस्या जाणून घेतल्या. याप्रसंगी देसाईगंजातील व्यापारी व नागरिकांनी त्यांना विविध समस्यांचे निवेदन सादर करून त्या सोडविण्याची मागणी केली.
गोंदिया ते बल्हारशाह रेल्वे स्टेशनपर्यंत काही रेल्वेस्थानकाला नागपूरच्या प्रबंधक बंदोपाध्याय यांनी भेट दिली. दरम्यान दुपारी १२ वाजता त्यांनी वडसा रेल्वे स्टेशनला भेट देऊन येथील समस्या जाणून घेतल्या. याप्रसंगी वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक श्रीवास्तव वरिष्ठ परिचालन प्रबंधक अर्जुन सिब्बल, रेल्वे सुरक्षा आयुक्त तथ दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. नागरिकांच्या वतीने बंदोपाध्याय यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यांनी सदर मागण्यांचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी देसाईगंज येथील कन्हैैय्यालाल डेंगानी, जितेंद्र परसवानी, दीपक कुकरेजा, विलास ढोरे, किशोर परसवानी, पहलाज डेंगानी हजर होते.
निवेदनातील प्रमुख मागण्या
वडसा रेल्वे स्टेशनवर दरभंगा एक्सप्रेसचा थांबा देणे, गोंदिया ते रायगड जाणारी जनशताब्दी एक्सप्रेसचा विस्तार वडसा रेल्वेस्टेशन किंवा बल्हारशहापर्यंत करणे, यशवंतपूर-कोरबा एक्सप्रेस दररोज चालविणे, वडसा रेल्वे स्थानकावरील ओव्हर ब्रिजचा मुख्य मार्गापर्यंत विस्तार करणे, रेल्वे स्टेशनवर कोच इंडिकेटर लावणे, कर्मचाऱ्यांची संख्या वाढविणे, सीआरपीएफ जवान व पोलिसांची नियुक्ती करणे, रेल्वेस्थानकावर सर्व सोयीसुविधा व इमारतीचे बांधकाम करणे, यात्री प्रतिक्षालय तसेच तिकीटघर निर्माण करणे यासह विविध मागण्यांचे निवेदन बंदोपाध्याय यांना देण्यात आले.
 

Web Title: Review of the problems of the railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे