गडचिरोली जिल्ह्यात एसटी बस व दुचाकीच्या धडकेत पोलीस जवान जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 11:36 AM2019-02-25T11:36:41+5:302019-02-25T11:37:05+5:30

सोमवारी सकाळी ८.३० वाजता अहेरीहून-सिरोंचाकडे जाणारी बस एम एच ४० ६०९४ व दुचाकीचा नागेपल्ली येथील शाळेसमोर अपघात होऊन दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना घडली.

Police personnel injured in ST bus and two wheeler accident in Gadchiroli district | गडचिरोली जिल्ह्यात एसटी बस व दुचाकीच्या धडकेत पोलीस जवान जखमी

गडचिरोली जिल्ह्यात एसटी बस व दुचाकीच्या धडकेत पोलीस जवान जखमी

Next
ठळक मुद्देमाजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केली मदत

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: सोमवारी सकाळी ८.३० वाजता अहेरीहून-सिरोंचाकडे जाणारी बस एम एच ४० ६०९४ व दुचाकीचा नागेपल्ली येथील शाळेसमोर अपघात होऊन दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना घडली.
एस टी बस आलापल्ली मार्गाकडे जात असताना नागेपल्ली येथील राजे धर्मराव शाळेसमोर बस आणि दुचाकीचा समोरासमोर अपघात झाला. विश्वनाथ सुरज बंशी रा. अहेरी असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव असून तो अहेरी प्राणहिता पोलीस उपमुख्यालय येथे पोलीस शिपाई पदावर कार्यरत आहे.
याच मार्गाने माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचा ताफा जात होता. अपघात झाल्याचे दिसताच धर्मरावबाबा यांनी लगेच गाडी थांबवून आपले वाहन उपलब्ध करून दिले आणि याच वाहनातून अहेरी उपजिल्हा रुग्णलयात जखमीस दाखल करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते बबलू हकीम यांनी अहेरी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेऊन जखमीची पाहणी केली.

Web Title: Police personnel injured in ST bus and two wheeler accident in Gadchiroli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात