ब्रिटिशकालीन जिल्ह्याची दयनीय अवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 11:40 PM2019-05-04T23:40:02+5:302019-05-04T23:40:41+5:30

सध्याच्या गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागात समाविष्ट असलेला सिरोंचा तालुका हा ब्रिटिशाच्या काळात जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण होते. मात्र सिरोंचा तालुक्याचा अद्यापही अपेक्षित विकास झाला नाही. या तालुक्यात अनेक मूलभूत समस्या कायम असून पर्यटन विकासाचा अभाव आहे.

The pitiful state of the British district | ब्रिटिशकालीन जिल्ह्याची दयनीय अवस्था

ब्रिटिशकालीन जिल्ह्याची दयनीय अवस्था

Next
ठळक मुद्देसंडे अँकर । सिरोंचा तालुका विकासाच्या प्रतीक्षेत, मूलभूत सोयीसुविधा, उद्योगधंदे व पर्यटन विकासाचा अभाव

कौसर खान ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : सध्याच्या गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागात समाविष्ट असलेला सिरोंचा तालुका हा ब्रिटिशाच्या काळात जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण होते. मात्र सिरोंचा तालुक्याचा अद्यापही अपेक्षित विकास झाला नाही. या तालुक्यात अनेक मूलभूत समस्या कायम असून पर्यटन विकासाचा अभाव आहे.
सन १८७४ मध्ये सिरोंचा हे गाव वसल्याचा इतिहासतज्ज्ञांचे मत आहे. त्या काळात अपर गोदावरी जिल्हा आयुक्ताचे पद रिक्त होते. १० आॅक्टोबर ते २४ डिसेंबर १८७३ पर्यंत डी. ड्रायसेंडल हे उपायुक्त म्हणून कार्यरत होते. त्यानंतर २५ डिसेंबर १९६३ ते १० एप्रिल १८७५ या कालावधीत लेफ्टनंट कर्नल सी. एल. आर. ग्लासफोर्ड यांनी उपायुक्त पदाचा कार्यभार सांभाळला. त्यावेळच्या अपर गोदावरी जिल्ह्यात उत्कृष्ट तालुका म्हणून सिरोंचाची ख्याती होती. तत्कालीन बस्तर राज्याच्या ३३ किमी अंतरावर सिरोंचा तालुक्याची सीमा आखण्यात आली. १८६७ मध्ये सिरोंचा तालुक्याचे क्षेत्रफळ १० हजार ५३ चौरस एवढे निश्चित करण्यात आले. १८५७ च्या प्रथम भारतीय स्वातंत्र्य युध्दात त्याच्या वारसानांना ५०० रुपयांची वार्षिक पेन्शन सुरू केले. ती इसवी सन १८९५ पर्यंत सुरू होती. १८७४ मध्ये सिरोंचा तालुका चांदा जिल्ह्याचा भाग म्हणून संपर्कात आला. ब्रिटीश रेसीडेंट सिरोंचात राहून विभागाचे प्रशासकीय कारभार चालवित असायचे.

विश्रामगृह देते ऐतिहासिक स्मृतींना उजाळा
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेली सिरोंचा येथील शासकीय विश्रामभवनाची दुमजली इमारत आजही ब्रिटिशकालीन स्मृतींना उजाळा देते. शिवाय गोदावरील व प्राणहिता नदीच्या संगमाचे विहंगम दृश्य तसेच श्री कालेश्वर-मुक्तेश्वर मंदिर हे धार्मिकतेचे प्रतीक आहे. सन १८६१ मध्ये मध्यप्रांतांची निर्मिती करण्यात आली असून चांदा जिल्हा व नागपूर विभाग त्यांना समाविष्ट केल्याचे नमूद केले आहे. चांदा जिल्ह्यात मूल, वरोरा व ब्रह्मपुरी या तीन नव्या तालुक्याची निर्मिती करण्यात आली.

नैसर्गिक साधन संपत्तीचा उपयोग नाही
सिरोंचा तालुक्यात जल, जमीन, जंगल व इतर नैसर्गिक साधन संपत्ती मोठ्या प्रमाणात आहे. मात्र उद्योगधंदे निर्माण करण्यासाठी या साधन संपत्तीचा अद्यापही परिपूर्ण उपयोग सरकारकडून झाल्याचे दिसून येत नाही. ब्रिटिश काळात जिल्ह्याचा दर्जा असलेल्या सध्याचा सिरोंचा तालुका विकासापासून कोसो दूर असल्याचे दिसून येते.

Web Title: The pitiful state of the British district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.