पाईपचा भरधाव ट्रक उलटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 12:21 AM2019-05-11T00:21:59+5:302019-05-11T00:23:14+5:30

रायपूरवरून हैदराबादकडे पाईप घेऊन जाणारा भरधाव ट्रक सिरोंचा-आलापल्ली या राष्ट्रीयय महामार्गावर रेपनपल्लीनजीकच्या रिंग पुलाजवळ उलटून ट्रक चालक गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली.

Pipe filling truck reversed | पाईपचा भरधाव ट्रक उलटला

पाईपचा भरधाव ट्रक उलटला

Next
ठळक मुद्देचालक गंभीर : सिरोंचा-आलापल्ली मार्गावरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
कमलापूर : रायपूरवरून हैदराबादकडे पाईप घेऊन जाणारा भरधाव ट्रक सिरोंचा-आलापल्ली या राष्ट्रीयय महामार्गावर रेपनपल्लीनजीकच्या रिंग पुलाजवळ उलटून ट्रक चालक गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली.
तेलंगणा राज्यातील टीएस ०५ युसी २३५८ क्रमांकाचा ट्रक रायपूरवरून हैदराबादकडे पाईप घेऊन जात होता. दरम्यान रेपनपल्लीनजीक ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा ट्रक उलटला. यामध्ये चालक गंभीर जखमी झाला. सदर घटनेतील जखमी चालकाचे नाव कळू शकले नाही. त्याला लागलीच उपचारासाठी अहेरीच्या उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले असून वृत्त लिहिस्तोवर या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली नव्हती.
यापूर्वी सदर रिंग पुलाजवळ अनेक अपघात घडले असून जीवितहानी झाली आहे. सिरोंचा-आलापल्ली मार्गाचे रूंदीकरण करणे आवश्यक आहे.

Web Title: Pipe filling truck reversed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात