मध्यस्थीने पैसा व श्रमाची बचत

By admin | Published: June 19, 2017 01:44 AM2017-06-19T01:44:53+5:302017-06-19T01:44:53+5:30

मध्यस्तीच्या माध्यमातून वाद सोडविल्यास पैसा, श्रम यांची मोठी बचत होण्यास मदत होते. त्यामुळे नागरिकांनी आपसी वाद मध्यस्थीच्या माध्यमातून सोडवावे,

Mediation saving money and labor | मध्यस्थीने पैसा व श्रमाची बचत

मध्यस्थीने पैसा व श्रमाची बचत

Next

बी. एम. पाटील यांचे प्रतिपादन : अहेरीत मार्गदर्शन कार्यक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : मध्यस्तीच्या माध्यमातून वाद सोडविल्यास पैसा, श्रम यांची मोठी बचत होण्यास मदत होते. त्यामुळे नागरिकांनी आपसी वाद मध्यस्थीच्या माध्यमातून सोडवावे, असे आवाहन मुख्य न्याय दंडाधिकारी बी. एम. पाटील यांनी केले.
अहेरी दिवाणी व फौजदारी, कनिष्ठ स्तर न्यायालयात मध्यस्थी केंद्र मार्गदर्शन कार्यक्रमादरम्यान प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहेरी दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश डी. एस. जाधव होते. प्रमुख अतिथी म्हणून गडचिरोलीचे धर्मदाय आयुक्त सातव, सरकारी अभियोक्ता अभय शिखरे आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना न्या. पाटील म्हणाले की, न्यायालयात विविध प्रकारची दिवाणी व फौजदारी प्रकरणे दाखल होतात. या प्रकरणाचा निकाल लागण्यास बराच उशीर होतो. याचा फटका दोन्ही पक्षकारांना बसतो. मध्यस्ती केंद्रात प्रकरण दाखल करण्यास कोणतेच शुल्क लागत नाही. तसेच दोन्ही पक्षकारांच्यसा बाजू लक्षात घेऊन मध्यस्तीने तडजोड करण्याचा प्रयत्न केला जातो. यामुळे विविध कोर्टात अपिलमध्ये नेण्यापेक्षा तडजोडीतून वाद मिटतो. दोन्ही पक्षकारांच्या पैसा व श्रमाची बचत होण्यास फार मोठी मदत होते, असे प्रतिपादन न्या. पाटील यांनी केले.
न्या. जाधव यांनी मार्गदर्शन करताना मध्यस्ती केंद्र हा सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देणारा सोपा उपाय आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी मध्यस्ती केंद्राचा उपयोग करावा, असे आवाहन केले. संचालन अ‍ॅड. संघरत्न कुंभारे तर आभार अ‍ॅड. उदय गलबले यांनी मानले. कार्यक्रमात अ‍ॅड. सतीश जैनवार, अ‍ॅड. राजेंद्र प्रसाद, मंगनवार, अ‍ॅड. ज्योती ढोके, अ‍ॅड. ममता गलबले आदी उपस्थित होते.

Web Title: Mediation saving money and labor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.