सिरोंचा शहर समस्यांचे माहेरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 12:26 AM2019-06-07T00:26:58+5:302019-06-07T00:27:29+5:30

सिरोंचा नगर पंचायत होऊन चार वर्षांचा कालावधी उलटला आहे. मात्र नियोजनाचा अभाव व नियमित मुख्याधिकारी नसल्यामुळे शहरात रस्ते, नाल्या, पथदिवे, अतिक्रमणासह अनेक समस्या ऐरणीवर आल्या आहेत. परिणामी सिरोंचा शहर समस्यांचे माहेरघर बनले आहे.

The headquarters of Sironcha city problems | सिरोंचा शहर समस्यांचे माहेरघर

सिरोंचा शहर समस्यांचे माहेरघर

googlenewsNext
ठळक मुद्देनियमित सीओंचा अभाव : रस्ते, नाली, पथदिव्यांसह अतिक्रमणांची समस्या ऐरणीवर

नागभूषणम चकिनारपूवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : सिरोंचा नगर पंचायत होऊन चार वर्षांचा कालावधी उलटला आहे. मात्र नियोजनाचा अभाव व नियमित मुख्याधिकारी नसल्यामुळे शहरात रस्ते, नाल्या, पथदिवे, अतिक्रमणासह अनेक समस्या ऐरणीवर आल्या आहेत. परिणामी सिरोंचा शहर समस्यांचे माहेरघर बनले आहे.
७ मे २०१९ पासून २ जूनपर्यंत नगर पंचायतीचे मुख्याधिकारी वैद्यकीय रजेवर गेले असल्याचे नगर पंचायतीच्या सुत्रांकडून सांगण्यात आले. सिरोंचा येथे मुख्याधिकारीपदी नियुक्ती असताना सुद्धा या अधिकाऱ्यांकडे अहेरी नगर पंचायतीचा अतिरिक्त प्रभार होता. त्यामुळे येथील मुख्याधिकारी आठवड्यातून एक ते दोनच दिवस सिरोंचा नगर पंचायतीत कर्तव्यावर दिसत होते. परिणामी नागरिकांना विविध दाखले व इतर कामांसाठी येथे वारंवार चकरा माराव्या लागत होत्या, ही परिस्थित अजूनही कायम आहे. कोंडवाड्यापासून नगर पंचायतीला आर्थिक उत्पन्न मिळू शकते. मात्र नगर पंचायतीने कोंडवाड्याचा वापरच केला नाही. ग्रामपंचायतीच्या काळात शहरातील कोंडवाड्याचा नियमित वापर होत होता. मोकाट जनावरांचा हैदोस वाढला असतानाही नगर पंचायतीचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
शहरातील सार्वजनिक विहिरीत भरपूर पाणी आहे. मात्र देखभाल व दुरूस्तीअभावी या विहिरीतील दूषित पाणी प्यावे लागत आहे. अनेक नागरिक कचरा टाकण्यासाठी विहिरीचा वापर करतात. परिणामी सिरोंचातील विहिरी कचराकुंड्या बनल्या आहेत.
घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत नाली स्वच्छता व कचºयाच्या विल्हेवाटीच्या कामाचा कंत्राट अमरावतीच्या एका कंत्राटदाराला देण्यात आला. यापूर्वी कंत्राटदाराला दरमहा ४ लाख ९८ हजार रुपये दिले जातात. मात्र नियोजनाअभावी शहरात नालीची स्वच्छता योग्यरित्या होत नाही. नाल्याचा उपसा नियमित केला जात नसल्याने काही प्रभागातील नाल्या कचºयाने तुडूंब भरल्या आहेत. परिणामी परिसरात दुर्गंधी निर्माण झाली आहे. अनेक वॉर्डात नाल्यांचा अभाव असल्याने सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. एकूणच शहर अस्वच्छतेच्या गर्तेत सापडले आहे.

जीर्ण पाणीटाकीकडे दुर्लक्ष
सिरोंचा नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने शहरातील सर्व वॉर्डात नळाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. यासाठी विश्रामगृहाजवळ टाकी उभारण्यात आली. मात्र ही टाकी फार जुनी असून ती जीर्ण झाली आहे. सदर पाणीटाकीची स्वच्छता नियमित केली जात नाही. त्यामुळे पावसाळ्यात गढूळ पाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. सातत्याने मागणी करूनही नगर पंचायत प्रशासनाने पाण्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे.

न.पं.चा बुडतोय महसूल
सिरोंचा येथील आठवडी बाजार व दैनिक गुजरी बाजाराची लिलाव प्रक्रिया यंदा राबविण्यात आली नाही. प्रशासनाच्या वतीने दरवर्षी मार्च महिन्यात सदर दोन्ही बाजाराचा लिलाव केला जातो. १ एप्रिल ते ३१ मार्च या आर्थिक वर्षाच्या कालावधीसाठी बाजार लिलाव प्रक्रिया दरवर्षी राबविली जात होती. मात्र यंदा लिलाव प्रक्रिया थंडबस्त्यात आहे. नगर पंचायतीचे व्यावसायिक गाळे भाडे तत्त्वावर देण्यात आले नाही. त्यामुळे महसूल बुडत आहे.

Web Title: The headquarters of Sironcha city problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.