आदिवासी युवकांना सैन्यभरतीत सवलत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 12:31 AM2018-09-29T00:31:39+5:302018-09-29T00:32:57+5:30

भारतीय लष्करासाठी जवानांची अमरावती येथे पदभरती होत असून त्यात विदर्भातील बेरोजगार युवकांना देशसेवा करण्याची चांगली संधी मिळणार आहे. त्यातही आदिवासी क्षेत्रातील युवकांना उंची आणि वजनातही सूट दिली जात आहे.

Giving relief to tribal youth | आदिवासी युवकांना सैन्यभरतीत सवलत

आदिवासी युवकांना सैन्यभरतीत सवलत

Next
ठळक मुद्देआॅनलाईन नोंदणी सुरू : जिल्ह्यातील सर्व बेरोजगार युवकांना देशसेवेची संधी

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : भारतीय लष्करासाठी जवानांची अमरावती येथे पदभरती होत असून त्यात विदर्भातील बेरोजगार युवकांना देशसेवा करण्याची चांगली संधी मिळणार आहे. त्यातही आदिवासी क्षेत्रातील युवकांना उंची आणि वजनातही सूट दिली जात आहे. याचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन दीपक लिमसे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत कॅप्टन लिमसे यांनी या भरतीसंदर्भात सविस्तर माहिती दिली. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर हेसुद्धा उपस्थित होते.
दरवर्षी देशाच्या लष्करात ५० ते ६० हजार सैनिक निवृत्त होतात. दरवर्षी तेवढीच पदे भरली जातात. त्यात महाराष्ट्रातील ६ ते ७ हजार जण असतात. यावेळी राज्यात ४ ठिकाणी ही पदभरती होत आहे. त्यात विदर्भासाठी अमरावती येथे भरती होत असून केवळ आॅनलाईन नोंदणी करणाऱ्यांनाच या भरतीसाठी जाता येणार आहे. येत्या ७ आॅक्टोबरपर्यंत आॅनलाईन नोंदणी करता येणार आहे. त्यानंतर ९ आॅक्टोबरपासून वेबसाईटवरून संबंधित उमेदवारांना त्यांचे प्रवेशपत्र डाऊनलोड करता येईल.
आठवी उत्तीर्ण असणाºया कोणत्याही युवकांना या सैन्यभरतीत सहभागी होता येणार आहे. आदिवासी युवकांसाठी १७० सेंटीमीटर उंचीऐवजी १६२ सेंटीमीटर उंची पात्र राहणार आहे. तसेच सामान्य युवकांसाठी असलेल्या किमान ५० किलो वजनाची अट आदिवासी युवकांसाठी शिथिल राहणार आहे. आदिवासी युवकांमध्ये शारीरिक क्षमता चांगली असली तरी ते लेखी परीक्षेत मागे पडतात. त्यामुळे गडचिरोलीत आणि काही ठिकाणी ग्रामीण भागातही त्यांच्यासाठी पोलीस विभागाच्या वतीने मार्गदर्शन केले जाणार असल्याचे जि.मा.अधिकारी दैठणकर यांनी सांगितले.
युवकांनी हे लक्षात ठेवावे
सैन्यभरतीसाठी प्रवेशपत्रावर दिलेल्या तारखेच्या आधल्या दिवशी रात्री १ ते सकाळी ६ पर्यंतच प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे भरतीच्या ठिकाणी आधल्या दिवशी पोहोचणे आवश्यक आहे.
प्रवेशपत्राच्या चांगल्या प्रिंटआऊट सोबत एकाचवेळी काढलेले पांढऱ्या पार्श्वभूमीवरील २० फोटो आणि मूळ शैक्षणिक कागदपत्रे, तसेच कागदपत्रांच्या प्रमाणित केलेल्या तीन झेरॉक्स प्रती सोबत न्याव्या लागणार आहेत.
वैद्यकीय चाचणीत नापास झालेल्या उमेदवारांना चाचणीत काही शंका वाटल्यास तिथेच अपिल करण्याची सोय आहे. त्यासाठी हेल्प डेस्क राहणार आहे. त्याचा लाभ घ्यावा, असेही कॅप्टन लिमसे यांनी सांगितले.

Web Title: Giving relief to tribal youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Soldierसैनिक