गडचिरोलीच्या कोरचीनजीक नक्षलवाद्यांचा बॉम्बस्फोट, एक पोलीस जवान शहीद, दोघे गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 10:10 PM2017-11-24T22:10:09+5:302017-11-24T22:16:54+5:30

नक्षलवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशीही हिंसाचार घडविला. शुक्रवारी दुपारी ३ च्या सुमारास कोरची तालुक्यातील कोटगूल येथे घडविलेल्या बॉम्बस्फोटात एक पोलीस जवान शहीद तर दोन गंभीर जखमी झाले. सततच्या या नक्षली हिंसाचारामुळे नक्षलविरोधी मोहिमेला जबर हादरा बसला आहे.

Gadchiroli's near korchi Naxalites blast, a police jawan martyr, both serious | गडचिरोलीच्या कोरचीनजीक नक्षलवाद्यांचा बॉम्बस्फोट, एक पोलीस जवान शहीद, दोघे गंभीर

गडचिरोलीच्या कोरचीनजीक नक्षलवाद्यांचा बॉम्बस्फोट, एक पोलीस जवान शहीद, दोघे गंभीर

Next
ठळक मुद्देजखमींना हेलिकॉप्टरने नागपुरात हलविलेएका संशयित युवकाला घेतले ताब्यात

आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : नक्षलवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशीही हिंसाचार घडविला. शुक्रवारी दुपारी ३ च्या सुमारास कोरची तालुक्यातील कोटगूल येथे घडविलेल्या बॉम्बस्फोटात एक पोलीस जवान शहीद तर दोन गंभीर जखमी झाले. सततच्या या नक्षली हिंसाचारामुळे नक्षलविरोधी मोहिमेला जबर हादरा बसला आहे.
सुरेश गावडे, सोनल खेवले व विकास धात्रक हे तीन जवान या घटनेत गंभीर जखमी झाले. त्यापैकी सुरेश गावडे नागपूरच्या रुग्णालयात उपचारादरम्यान दगावला. हे सर्व नक्षलविरोधी अभियान पथक सी-६० चे जवान आहेत. कोटगूल येथील शासकीय आश्रमशाळेपासून अवघ्या १०० मीटरवर हा स्फोट झाला. गावात शुक्रवारी आठवडी बाजार होता. बाजारात ज्या ठिकाणी मांसविक्रीची दुकाने लागतात तेथून जवळच नाल्यावर एक रपटा आहे. त्या रपट्याखालील पाण्याच्या पाईपमध्ये नक्षलवाद्यांनी दोन बॉम्ब लावले होते. बाजाराच्या दिवशी नक्षलवादी येत असल्याने रपट्यावर बसून तीन पोलीस जवान देखरेख करीत होते. याचवेळी रपट्याखालील बॉम्बचा स्फोट झाला.
दोनपैकी एकच फुटला. दुसरा बॉम्ब नंतर पोलिसांनी निकामी केला. माहिती मिळताच जिल्हा पोलीस दलाचे हेलिकॉप्टर पाठवून जखमींना उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले.
या घटनेनंतर घटनास्थळावरून एक युवक जंगलाच्या दिशेने पळून जाताना दिसला. त्याला पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले. त्याची चौकशी सुरू आहे. नक्षलवाद्यांनी हा बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी गावातील युवकाची मदत घेतल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
कोरची या तालुका मुख्यालयापासून २७ किलोमीटरवर असलेल्या कोटगुलजवळ रस्त्याचे काम सुरू आहे. हे काम बंद करा, असे लिहिलेले बॅनर नक्षलवाद्यांनी आलोंडी-किटेसूरदरम्यान लावले होते. मात्र त्याची दखल घेतली नसल्यामुळे हा स्फोट घडवून आणल्याचे बोलले जाते.

बॉम्बस्फोटात जखमी जवानांची प्रकृती स्थिर
बॉम्बस्फोटात जखमी झालेल्या तीन पोलीस जवानांना उपचारासाठी नागपुरातील आॅरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये आणले असताना यातील एक पोलीस जवान शहीद झाला. दोन जवानांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
शहीद झालेल्या पोलीस जवानाचे नाव सुरेश दयाराम गावडे (४०), असे आहे. जखमी जवानाचे नाव सोनल चरणदास खेवले (२५) आणि विकास महादेव ढवळे (३०), असे आहे.
गडचिरोली येथून तिन्ही जवानांना हेलिकॉप्टरच्या मदतीने नागपुरात आणण्यात आले. येथून रुग्णवाहिकेतून आॅरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यावेळी सुरेश गावडे यांची तपासणी केली असताना ते मृत आढळून आले. हॉस्पिटलने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार, बॉम्बस्फोटामुळे गावडे यांचे फुफ्फुस व शरीरातील इतर अवयवांना खोल जखमा झाल्या होत्या. या शिवाय, डोके व चेहºयावरही जखमा होत्या. जखमीमधील सोनल खेवले यांची प्रकृती स्थिर असून त्यांंच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. त्यांचे डोके, डावा कान, डावा डोळा आणि हातावर जखमा आहेत. विकास ढवळे या जवानाच्या शरीरावर जखमा असल्यातरी ते धोक्याबाहेर आहे. त्यांना वॉर्डात उपचारासाठी ठेवण्यात आले आहे. रुग्णालयाचे क्रिटीकल केअर तज्ज्ञ डॉ. राजेश अटल, डॉ. तुषार भुरे, डॉ. मुकुंद ठाकूर, डॉ. मो. हुसैन भाटी, डॉ. अभय आगाशे व डॉक्टरांची चमू या जवानाच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत.

 

Web Title: Gadchiroli's near korchi Naxalites blast, a police jawan martyr, both serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.