गडचिरोली बंदला संमिश्र प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 10:42 PM2019-01-28T22:42:41+5:302019-01-28T22:42:54+5:30

ओबीसी प्रवर्गाची जनगणना करावी, या मुख्य मागणीसाठी ओबीसी युवा महासंघ व इतर ओबीसी संघटनांनी सोमवारी गडचिरोली शहर बंदचे आवाहन केले होते. याला गडचिरोली शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला.

Gadchiroli Bandla composite response | गडचिरोली बंदला संमिश्र प्रतिसाद

गडचिरोली बंदला संमिश्र प्रतिसाद

Next
ठळक मुद्देओबीसींची जनगणना करा : सर्वपक्षीय युवकांचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : ओबीसी प्रवर्गाची जनगणना करावी, या मुख्य मागणीसाठी ओबीसी युवा महासंघ व इतर ओबीसी संघटनांनी सोमवारी गडचिरोली शहर बंदचे आवाहन केले होते. याला गडचिरोली शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला.
ओबीसी युवा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सकाळीच शाळा, महाविद्यालयांमध्ये जाऊन बंदचे आवाहन केले. त्यामुळे शहरातील काही शाळा बंद तर काही शाळा सुरू होत्या. काही व्यापाºयांनी सकाळपासूनच दुकाने बंद ठेवली होती. व्यापाºयांनी आंदोलकांचा अंदाज घेऊन दुकाने सुरू केली. परंतू ओबीसी युवा संघटनेच्या पदाधिकाºयांनी शहरातून बाईक रॅली काढून दुकानदारांना बंदचे आवाहन केले. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत अनेक दुकानादारांनी व्यवहार बंद ठेवले. दुपारी ३ वाजताच्या नंतर पुन्हा काही दुकाने सुरू करण्यात आली. एकंदरीतच गडचिरोली बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. बंद यशस्वी करण्यासाठी सर्वच पक्षातील युवा नेते व संघटनेच्या पदाधिकाºयांनी सहकार्य केले.

Web Title: Gadchiroli Bandla composite response

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.